**अल्पसंख्याक समाजाला दादांनी दिलेला शब्द पुर्ण केला.**
दोडाईचा अख्तर शाह
राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचे मागासलेपण दूर करुन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी टार्टी', 'बार्टी', 'सारथी', 'महाज्योती', 'अमृत'च्या धर्तीवर 'अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे 'एमआरटीआय'ची स्थापना करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने आज घेतलेला निर्णय म्हणजे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांचे यश असल्याचे सांगत राज्यातील अनेक मुस्लिम तसेच अल्पसंख्यांक बांधवांच्या संस्था, संघटनांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन केले आहे. अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थेसाठी एकूण ११ पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या संस्थेच्या आस्थापनेवरील पदांचे वेतन, कार्यालयीन खर्च, मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी, प्रशिक्षणासाठी एकूण ६ कोटी २५ लाख रुपयांच्या खर्चासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
*अल्पसंख्याक समाजासाठी महत्त्वाच्या असलेल्या अल्पसंख्यांक संशोधन व प्रशिक्षण संस्थांच्या स्थापनेस (पार्टी ) राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी दिल्याबद्दल राज्यातील सबंध मुस्लिम समाजाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित दादा पवार साहेब यांचे मनापासून आभार व धन्यवाद*
*इर्शाद भाई जहागिरदार*
*(प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)*
