बावडा गावच्या विस्तारित नळपाणीपुरवठा योजनेसाठी रु. 2 कोटींचा निधी - अंकिता पाटील ठाकरे



प्रतिनिधी दत्ता पारेकर 

    पुणे:बावडा गावच्या विस्तारित नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 2 कोटी 3 लाख 77 हजार रुपयांच्या निधीस जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेने शुक्रवारी ( दि. 4 फेब्रु. ) प्रशासकीय मंजुरी दिली आहे, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांनी दिली.
         माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नांमुळे सदरची विस्तारित नळपाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. या योजनेमुळे बारावा फाटा -अरगडे वस्ती- घोगरेवस्ती- रत्नप्रभादेवीनगर येथील नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळणार आहे, अशी माहिती अंकिता पाटील ठाकरे यांनी दिली. बावडा- लाखेवाडी जिल्हा परिषद गटासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केला जात असून, विकास कामासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे अंकिता पाटील ठाकरे यांनी सांगितले. यावेळी बावडा गावचे सरपंच किरण पाटील, उपसरपंच निलेश घोगरे उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने