अवाजवी लाईट बिलांचा भडका; शिरपूरमध्ये MSEB विरोधात शिरपूर फास्ट चे ठिय्या आंदोलन

 



अवाजवी लाईट बिलांचा भडका; शिरपूरमध्ये MSEB विरोधात शिरपूर फास्ट चे ठिय्या आंदोलन


शिरपूर (जि. धुळे) | प्रतिनिधी

शिरपूर शहर व तालुक्यात अवाजवी व अनाठायी लाईट बिले, तसेच शेतकऱ्यांना अपुरा वीजपुरवठा या गंभीर समस्यांमुळे जनतेत तीव्र संताप उसळला आहे. या पार्श्वभूमीवर शिरपूर फर्स्ट च्या वतीने आज MSEB (महावितरण) कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील नागरिकांना वापर नसतानाही हजारो रुपयांची लाईट बिले येत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अनेक घरांमध्ये मीटर बंद असतानाही जादा बिल आकारले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. याशिवाय शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या आठ तासांच्या वीजपुरवठ्यात सातत्याने कपात होत असून, शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचेही आंदोलकांनी सांगितले.

या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी नागरिकांच्या अवाजवी लाईट बिलांचे तोरण तयार करून MSEB कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावून जाहीर निषेध नोंदवला. “हा केवळ प्रशासनाचा निष्काळजीपणा नसून सामान्य नागरिक व शेतकऱ्यांवरील अन्याय आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली.

आंदोलनात स्वतंत्र ‘मदत कक्ष’ (हेल्प डेस्क) सुरू करण्याची ठोस मागणी करण्यात आली, जेणेकरून नागरिकांच्या तक्रारी तातडीने नोंदवून त्यावर वेळेत उपाययोजना करता येतील.

“बिल दुरुस्ती, मीटर तपासणी, वीजपुरवठ्याचे वेळापत्रक आणि शेतकऱ्यांच्या तक्रारी यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करावी,” अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

या ठिय्या आंदोलनाला शिरपूर शहरातील मोठ्या संख्येने नागरिक तसेच तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. आंदोलन शांततेत पार पडले असले तरी, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.


#Shirpur

#DhuleDistrict

#MSEB

#Mahavitaran

#PowerCrisis

#ElectricityIssue

#InflatedElectricityBills

#FarmerProblems

#FarmersProtest

#PublicProtest

#PowerSupplyFailure

#ElectricityScam

#JusticeForConsumers

#MaharashtraNews

#BreakingNews


Shirpur News, Dhule News, Maharashtra News, MSEB Protest, Mahavitaran Issues, Electricity Bill Hike, Power Cut Issue, Farmer Electricity Problem, Shirpur Farmers, Public Protest Shirpur, Electricity Department Failure, Rural Maharashtra News, Farmers Crisis, Local News Update, Ground Report



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने