शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत भव्य योग मार्गदर्शन शिबिर

 


शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत भव्य योग मार्गदर्शन शिबिर

शिरपूर — आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून शिरपूर येथे पतंजली योग समितीच्या वतीने भव्य योग मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला पतंजली योग समिती महाराष्ट्र पूर्वचे राज्य प्रभारी अनिल अमृतवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
शिरपूर तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत सर्व शाळांमधील शिक्षक तसेच शिरपूर तहसीलमधील पतंजली परिवारातील सदस्यांच्या उपस्थितीत अवेंजर टर्फ येथे जागतिक योग दिनाच्या प्रोटोकॉलनुसार योग मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरात योगाचे महत्त्व, दैनंदिन जीवनातील उपयुक्तता तसेच शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योगाभ्यासाचे फायदे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी विठ्ठल घुगे (गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती शिरपूर), केंद्रप्रमुख चंद्रशेखर पाटील, विनय नेरकर, ऋषिकेश कोळी, सुहास अहिरे, विनोद जाधव, पतंजली युवा भारत जिल्हा प्रभारी जितेंद्र शेटे, पतंजली महिला जिल्हा प्रभारी प्रतिभा शिसोदे, भारत स्वाभिमान न्यास तालुका प्रभारी किशोर गुरव, योग गुरुजी भरत कदम, पतंजली योग समिती तालुका प्रभारी भगवान ठाकूर, युवा भारत तालुका प्रभारी मनोज आटवाल, किसान पंचायत तालुका प्रभारी सुनील गुरव यांच्यासह अनेक पदाधिकारी व योगप्रेमी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे शिक्षक व नागरिकांमध्ये योगाबाबत जागृती निर्माण झाली असून, नियमित योगाभ्यासाचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.
#शिरपूर
#योगदिन
#आंतरराष्ट्रीययोगदिन
#PatanjaliYoga
#YogaForHealth
#YogaAwareness
#HealthyIndia
#YogaCamp
#TeacherParticipation
#DhuleDistrict

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने