आश्रमशाळा वाघाडी येथे महाराणा प्रतापसिंह जयंती उत्साहात साजरी
आज दिनांक 17 जून 2026 बुधवार रोजी आमच्या आर.सी.पटेल अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा वाघाडी येथे हिंदुकुलसूर्य महाराणा प्रतापसिंह यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी शाळेचे प्राचार्य श्री जे.व्हि.गिरासे, मुख्याध्यापक श्री पी.एन. लोहार तसेच शाळेतील सर्व वरिष्ठ शिक्षक बंधू भगिनी यांची उपस्थिती या कार्यक्रमास लाभली. प्राचार्य व मुख्याध्यापक यांच्या हस्ते महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच शाळेतील उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी देखील प्रतिमेचे पूजन करून महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन केले. या कार्यक्रमादरम्यान शाळेचे प्राचार्य श्री जे.व्ही गिरासे यांनी महाराणा प्रताप सिंह यांच्या थोर अशा जीवन कार्यावर आपल्या अद्वितीय अशा व्याख्यानाद्वारे प्रकाश टाकून उपस्थित सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना चित्त थरारक असा इतिहास जिवंतपणे उभा केला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री बी.एन.लोहार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ शिक्षक श्री एस.एम भलकार होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री एस.के.चौधरी यांनी केले. सांस्कृतिक समितीने या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली कार्यक्रमाच्या यशस्वी साठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांचे सहकार्य लाभले.
