साक्री–पिंपळनेर परिसरातील पशुधन चोरी उघडकीस ; आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश

 


साक्री–पिंपळनेर परिसरातील पशुधन चोरी उघडकीस ; आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश

धुळे जिल्ह्यातील साक्री व पिंपळनेर परिसरात शेतकऱ्यांच्या शेतातून पशुधन चोरीच्या वाढत्या घटनांमुळे मोठी चिंता निर्माण झाली होती. या घटनांची गंभीर दखल घेत धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांनी विशेष तपास पथक गठीत करून मोठी कारवाई केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दि. 22 जून 2026 रोजी साक्री–नवापूर रोडवरील एका पानटपरीजवळून सराईत गुन्हेगार सुरेश उर्फ सुन्या रमेश गावीत (वय 32, रा. सारवट, ता. नवापूर, जि. नंदुरबार) यास ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने आपल्या तीन साथीदारांसह संघटितपणे टाटा आर.एक्स. चारचाकी वाहनाचा वापर करून साक्री व पिंपळनेर परिसरातून म्हशी चोरी केल्याची कबुली दिली.
आरोपीकडून एकूण 09 जाफराबादी व मुरा जातीच्या म्हशी, 02 पारडू तसेच टाटा आर.एक्स. चारचाकी वाहन (MH-18/AA-2376) असा एकूण 15 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईत पशुधन चोरीचे 03 व चारचाकी वाहन चोरीचा 01 असे एकूण 04 गुन्हे उघडकीस आले आहेत.
या प्रकरणातील उर्वरित तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. अटक झालेल्या आरोपींवर यापूर्वीही चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही टोळी आंतरजिल्हा पातळीवर कार्यरत असल्याचा संशय असून पुढील तपासात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

#DhulePolice
#LocalCrimeBranch
#PashudhanChori
#CattleTheft
#CrimeNews

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने