शिरपूर हादरले! भरदिवसा वाय. एन. काझी नगरमध्ये धाडसी घरफोडी; लाखोंचा ऐवज लंपास
शिरपूर | प्रतिनिधी
शिरपूर शहरातील वाय. एन. काझी नगर परिसरात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीच्या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी घरमालक घराबाहेर गेल्याची संधी साधत घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भूषण पाटील व पुनम पाटील हे दोघे शिरपूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी सकाळी सुमारे १० वाजता दोघेही घराला कुलूप लावून ड्युटीसाठी बाहेर गेले होते. याच वेळेत अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटे फोडत सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली.
घटना उघडकीस आल्यानंतर वाय. एन. काझी नगर परिसरात नागरिकांमध्ये भीती व संतापाची भावना व्यक्त होत आहे. भरदिवसा घडलेल्या या घरफोडीमुळे शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच उपनगराध्यक्षा संगीता देवरे यांनी तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत करण्यात आले आहे.
दरम्यान, अशा प्रकारच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून, चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
#शिरपूर
#घरफोडी
#चोरी
#धाडसीचोरी
#कायदा_सुव्यवस्था
#पोलीस_तपास
#Shirpur
#BreakingNews
#DaylightRobbery
#CrimeNews
#MaharashtraNews
#Robbery
#PublicSafety
