मा. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी BJS वाघोलीच्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान

 


मा. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी BJS वाघोलीच्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान


मुंबई, २१ जून २०२६ : 


भारतीय जैन संघटना (BJS) संचालित वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पाच्या (WERC) गेल्या ३२ वर्षांच्या प्रवासात घडलेल्या यशस्वी माजी विद्यार्थ्यांच्या गौरवार्थ महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकृत निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर अभिनंदन सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी लातूर भूकंपग्रस्त, अनाथ, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील तसेच आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांपैकी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. 


कार्यक्रमात श्री. पद्माकर गोरे लिखित ‘फिनिक्स (यशोगाथा)’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षणाच्या बळावर स्वतःचे आयुष्य घडविणाऱ्या WERCच्या विद्यार्थ्यांच्या बदललेल्या जीवनाची गाथा या पुस्तकात मांडण्यात आली आहे.


हा सोहळा महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, श्रीमती अमृता फडणवीस (संस्थापक, दिव्यज फाउंडेशन), श्री. शांतिलाल मुथ्था (संस्थापक, भारतीय जैन संघटना), कु. दिविजा फडणवीस, श्री. विलास राठोड आणि कोमल जैन (मैनेजिंग डायरेक्टर, BJS) यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.


या कार्यक्रमातून WERCच्या शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पाने हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात घडवून आणलेल्या परिवर्तनाचा गौरव करण्यात आला आणि शिक्षणाच्या माध्यमातून घडलेल्या यशस्वी जीवनप्रवासांचा प्रेरणादायी उत्सव साजरा करण्यात आला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने