एल-निनोचा इशारा : ३१ ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य — बेकायदेशीर पाणी उपशावर कडक कारवाईचे आदेश
मुंबई | प्रतिनिधी
यंदा एल-निनो परिस्थितीचा प्रभाव राहण्याची शक्यता लक्षात घेता राज्यात पर्जन्यमान घटण्याचा धोका निर्माण झाला आहे. भारतीय हवामान विभाग यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार संभाव्य दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई उद्भवू नये, यासाठी महाराष्ट्र शासनाने कठोर व तातडीचे निर्देश जारी केले आहेत.
प्रधान सचिव (जलसंपदा) एकनाथ डवले यांनी १३ जून २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत राज्यातील शहरी व ग्रामीण भागात अखंडित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाने धरणे, जलाशय व जलस्रोतांमधील पाणीसाठ्याचा तातडीने आढावा घ्यावा.
सिंचनासाठी सुरू किंवा प्रस्तावित पाणी आवर्तने तात्काळ बंद करण्याचे स्पष्ट आदेश.
पिण्याच्या पाण्यासाठी राखीव जलसाठा कोणत्याही परिस्थितीत इतर कारणांसाठी वापरू नये.
३१ ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत राहावा यासाठी जिल्हास्तरावर कृती आराखडा तयार करावा.
स्थानिक स्वराज्य संस्था, पाणीपुरवठा विभाग व जलसंपदा विभाग यांच्यात प्रभावी समन्वय ठेवण्याचे निर्देश.
धरणे, नद्या, कालवे, तलाव व इतर जलस्रोतांमधून होणारा बेकायदेशीर व अनधिकृत पाणी उपसा तात्काळ थांबविण्यासाठी विशेष मोहीम राबवावी.
महसूल, पोलीस व जलसंपदा विभागांच्या संयुक्त पथकांमार्फत नियमित तपासणी व गस्त.
अनधिकृत मोटारी, पंप, पाईपलाईन आदींवर शासन निर्णय (दि. १२.१२.२०१८) नुसार कडक कारवाई.
पाणीसाठा, पाणीपुरवठा व कारवाईबाबतचा सविस्तर साप्ताहिक अहवाल शासनास सादर करणे बंधनकारक.
कोणत्याही परिस्थितीत राज्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासू नये, याची संपूर्ण जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर टाकण्यात आली आहे. निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी न झाल्यास जबाबदारी निश्चित केली जाईल, असा इशाराही शासनाने दिला आहे.
#ElNino
#WaterCrisis
#DrinkingWaterPriority
#WaterManagement
#MaharashtraNews
#DroughtAlert
#WaterConservation
#IllegalWaterUse
#WaterSecurity
#PublicInterest
#GovernmentOrders
#IMDAlert
#WaterResources
#RuralAndUrbanWater
#ClimateImpact
El Nino Effect
Maharashtra Water Supply
Drinking Water Availability
Water Scarcity
Illegal Water Extraction
Water Resource Department
District Administration
Drought Preparedness
Climate Change Impact
Indian Meteorological Department
Public Water Supply
Government Directives
Water Conservation Policy
Emergency Water Management
