धुळे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निलेश रुणवाल; २०२६–२०२९ साठी नूतन कार्यकारिणी जाहीर
धुळे, दि. — धुळे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन च्या आगामी तीन वर्षांच्या (२०२६ ते २०२९) कार्यकाळासाठी नूतन जिल्हा कार्यकारिणी व तालुका अध्यक्षांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या निवडणूक प्रक्रियेत जिल्हाध्यक्षपदी श्री. निलेश नंदलाल रुणवाल यांची एकमताने निवड करण्यात आली असून, जिल्हा सचिवपदी श्री. शांतिलाल संतोष पाटील तर जिल्हा कोषाध्यक्षपदी श्री. कनक दिनेशकुमार गाबडा यांची निवड झाली आहे.
ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. जगन्नाथजी शिंदे (आप्पासाहेब) यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली. त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेची लोकशाही परंपरा, संघटनात्मक शिस्त आणि औषध विक्रेत्यांच्या हितासाठी असलेली बांधिलकी अधिक मजबूत होत असल्याची भावना उपस्थित सदस्यांनी व्यक्त केली.
धुळे जिल्ह्यातील १००० हून अधिक किरकोळ व घाऊक औषध विक्रेत्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या नामांकित असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी श्री. इरफान अली लियाकत अली व श्री. प्रशांत सोमनाथ कोठावदे यांची निवड करण्यात आली आहे.
सहसचिवपदी श्री. सुनिल ऋषिकुमार शर्मा व श्री. जितेंद्र जगतसिंग गिरासे, तर संघटन सचिवपदी श्री. अनंतराव शालिग्राम पाटील यांची नियुक्ती झाली आहे.
🔹 तालुका अध्यक्षांची निवड
धुळे तालुका — श्री. दीपक रतनलाल खंडेलवाल
शिंदखेडा तालुका — श्री. हुक्मचंद हिरालाल जैन
शिरपूर तालुका — श्री. संदीप रविंदर संधवी
साक्री तालुका — श्री. धनंजय लक्ष्मण सोनवणे
🔹 जिल्हा कार्यकारिणी सदस्य
धुळे व शिंदखेडा विभागातून श्री. राजेंद्र गिंदोडिया, श्री. नरेश भगत, श्री. अनिल चौधरी, श्री. भारत तोलाणी, श्री. उज्वलकुमार जैन, बी. महावीर जैन, श्री. अनिल कांकरीया, श्री. मिलिंद निंबाळकर, श्री. संजय जैन व श्री. आशिष अग्रवाल यांची निवड करण्यात आली आहे.
🔹 तालुका प्रतिनिधी व सदस्य
शिरपूर व साक्री विभागातून श्री. भिकचंद जैन, श्री. दीपक शिरसाठ, श्री. राजेंद्र सोनवणे, श्री. वैभव बोरसे व श्री. भालचंद्र कोठावदे हे सदस्य म्हणून कार्य पाहणार आहेत.
👩⚕️ महिला विंगची ऐतिहासिक स्थापना
या कार्यकारिणीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे असोसिएशनच्या इतिहासात प्रथमच महिला विंगची स्थापना करण्यात आली आहे. महिला औषध विक्रेत्यांचे संघटन, सक्षमीकरण व नेतृत्व विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या या विंगच्या जिल्हा संयोजकपदी सौ. भावना भरत सनेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
🎯 नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा निर्धार
पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हाध्यक्ष श्री. निलेश रुणवाल व सचिव श्री. शांतिलाल संतोष पाटील यांनी सांगितले की,
“धुळे जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवणे, व्यवसाय अधिक पारदर्शक व डिजिटल करणे तसेच ग्राहकांना दर्जेदार व सुरक्षित सेवा देणे ही आमची प्रमुख उद्दिष्टे असतील. वरिष्ठ सदस्यांच्या अनुभवाच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण संघटना एकजुटीने काम करेल. महिला विंगच्या माध्यमातून महिला व्यावसायिकांना सक्षम व्यासपीठ देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.”
