धुळ्यात ‘आत्मा’ प्रकल्पात भरती घोटाळा! माजी प्रकल्प संचालकावर 16.85 लाखांची लाच घेतल्याचा आरोप

 


धुळ्यात ‘आत्मा’ प्रकल्पात भरती घोटाळा! माजी प्रकल्प संचालकावर 16.85 लाखांची लाच घेतल्याचा आरोप


धुळे | प्रतिनिधी

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), धुळे येथे मोठ्या प्रमाणावर झालेल्या बेकायदेशीर भरती व आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन प्रकल्प संचालक बबन नथ्थु पाटील यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी बबन नथ्थु पाटील हे दिनांक ०५ डिसेंबर २०१५ ते जुलै २०१८ या कालावधीत ‘आत्मा’ प्रकल्पात प्रकल्प संचालक पदावर कार्यरत होते. या कालावधीत त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत गट तंत्रज्ञान व्यवस्थापक (BTM) व सहायक तंत्रज्ञान अधिकारी (ATM) या पदांवर बेकायदेशीर नियुक्त्या केल्याचा आरोप आहे.

तक्रारीनंतर करण्यात आलेल्या उघड चौकशीत, उमेदवारांकडून त्यांच्या आई-वडिलांच्या बँक खात्यात २१ नोव्हेंबर २०१६ ते ०८ डिसेंबर २०१६ या कालावधीत एकूण १६ लाख ८५ हजार रुपये स्वीकारल्याचे निष्पन्न झाले आहे. शासनाच्या आदेशानुसार करार तत्वावरील भरतीस मनाई असतानाही बनावट नेमणूकपत्रे तयार करून नियमबाह्य नियुक्त्या करण्यात आल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.

या प्रकरणी आरोपीविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ तसेच भारतीय दंड विधानातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे करीत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल तपास सुरू आहे.

#DhuleNews

#CorruptionCase

#ATMAScam

#AntiCorruption

#LachLuchpat


#GovernmentRecruitment

Dhule

ATMA Project

Corruption in Recruitment

Anti Corruption Bureau

Maharashtra Crime

Government Scam

Breaking News Marathi

Dhule ACB


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने