शिरपूर नक्की कोणाचे? वेळ आलीय ‘मी शिरपूरकर’ अभियानाची!
परप्रांतीय कुटुंबातील दुहेरी हत्याकांडानंतर शिरपूर हादरले; स्थानिकांच्या अस्तित्वाचा आणि रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर, व्यापक आंदोलनाची गरज !
शिरपूर प्रतिनिधी -
शिरपूर शहरात नुकतीच एक अत्यंत धक्कादायक आणि अमानुष घटना उघडकीस आली आहे. एका पोटच्या मुलाने, चंदन महतोने, आपल्याच जन्मदात्या आई-वडिलांची—गंगा महतो आणि रंजूदेवी यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. या थरारक दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण शिरपूर तालुका हादरून गेला आहे. संशयित आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असला, तरी या घटनेने केवळ कायदा-सुव्यवस्थेचाच प्रश्न निर्माण केला नसून, शिरपूरच्या सामाजिक स्वास्थ्यासमोर एक अत्यंत गंभीर आणि अस्वस्थ करणारा प्रश्न उभा केला आहे– **‘शिरपूर नक्की कोणाचे?’*
शिरपूर शहर आणि तालुक्याला स्वतःची एक समृद्ध संस्कृती, उदात्त विचारधारा, संस्कारी ओळख आणि तेजस्वी इतिहास लाभला आहे. हे शहर राज्यामध्ये शिक्षणाचे माहेरघर आणि विकासाचे एक उत्तम मॉडेल म्हणून ओळखले जाते. परंतु, गेल्या काही वर्षांत परराज्यातून आणि शेजारील भागांतून होणारे स्थलांतर प्रचंड वाढले आहे. प्रस्तुत घटनेतील कुटुंब हे मूळचे बिहारमधील दरभंगा येथील आहे. या कुटुंबाप्रमाणेच शेजारील नंदूरबार, जळगाव, खेतिया आणि सेंधवा या भागांतून येणाऱ्या लोकांची संख्या कमालीची वाढली आहे. आज शहरातील अशा बाहेरील लोकांचे प्रमाण जवळपास काही टक्क्यांवर पोहोचल्याचे सांगितले जात आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की, या अनिर्बंध गर्दीसोबतच तिथली हिंसक मानसिकता, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि विकृत विचारधाराही शिरपूरच्या पवित्र भूमीत पाय पसरत आहे, ज्यामुळे आज शांतताप्रिय शिरपूरची नाहक बदनामी होत आहे.
या वाढत्या अतिक्रमणामुळे शिरपूरच्या स्थानिक भूमिपुत्रांच्या अस्तित्वाचा आणि अस्मितेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे बाहेरून येणारे लोक येथील आर्थिक संसाधनांवर दरोडा टाकत आहेत, तर दुसरीकडे येथील स्थानिक सुशिक्षित तरुण रोजगारासाठी वणवण भटकत आहेत. शिरपूरकरांच्या हक्काचा रोजगार बाहेरील लोकांच्या घशात घातला जात असल्यामुळे स्थानिक पातळीवर तीव्र असंतोष पसरला आहे. ही परिस्थिती आता सहनशक्तीच्या पलीकडे गेली आहे. म्हणूनच, ज्या शाळा, नामांकित शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक कंपन्या स्थानिक युवकांना रोजगार नाकारून बाहेरील लोकांना प्राधान्य देत आहेत, त्यांच्यावर कडक निर्बंध देखील लादले गेले पाहिजेत अशी सुप्त शिरपूरकरांची मागणी आता जोर धरू लागली आहे.
शिरपूरच्या या दुर्दशेला केवळ बाहेरील गुन्हेगारीच नाही, तर येथील राजकीय पोकळी आणि ‘दरबारी राजकारण’ देखील तितकेच कारणीभूत असल्याचा आरोप केला जात आहे. बाहेरून आलेला एक परिवार गेल्या ४ दशकापासून शिरपूर शहर आणि तालुक्याच्या राजकारणात सक्रिय ठाण मांडून बसला आहे. आणि सत्तेचा गैरफायदा लाटत आहे असा देखील विरोधकांच्या आरोप आहे. इतकेच नव्हे तर, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि आमदारांच्या अवतीभवती घुटमळणारे काही स्वार्थी, कमी शिकलेले आणि संस्कारहीन ‘दरबारी’ लोक स्वतःच्या पोळीवर तूप ओढण्यासाठी शिरपूरचा इतिहास आणि संस्कृती पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. हे दरबारी नेते लोकप्रतिनिधींची दिशाभूल करत असून, त्यांच्याकडे शिरपूरच्या भविष्यासाठी ना कोणती ठोस योजना आहे, ना त्यांच्यावर योग्य संस्कार आहेत. अशा सुमार आणि स्वार्थी नेतृत्वामुळेच शहरात विकृती वाढत चालली आहे.
आता शिरपूरकरांना खडबडून जागे होण्याची वेळ आली आहे. शिरपूरची तेजस्वी ओळख, शांतता आणि सुसंस्कृत विचारधारा टिकवून ठेवण्यासाठी संपूर्ण तालुक्यात अत्यंत व्यापक स्तरावर *‘मी शिरपूरकर’* अभियान राबवण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. हे अभियान केवळ एक चळवळ नसून, शिरपूरच्या अस्मितेचा एल्गार असणार आहे.
या अभियान अंतर्गत कडक पोलीस पडताळणी, बाहेरील आणि संशयास्पद लोकांची तातडीने कडक पोलीस पडताळणी झाली पाहिजे.
स्थानिक तरुणांना येथील उद्योग आणि संस्थांमध्ये रोजगारात १००% प्राधान्य मिळायला हवे.
शिरपूरच्या संस्कृतीचे होत असलेले विकृतीकरण तात्काळ थांबले पाहिजे.
शिरपूरच्या अस्तित्वाची ही लढाई जिंकण्यासाठी आणि स्थानिक युवकांना त्यांचा न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी सर्वच शिरपूरकरांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून तातडीने एकत्र येऊन या अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न करण्याची एक सामाजिक गरज शहरात निर्माण झाली आहे. हा प्रयत्न नेमका कोण करणार ? या या प्रयत्नास स्थानिक राजकारण सफल होऊ देईल का ? राजकारण विरहित समाजहित साध्य करत भरपूर च्या भविष्यासाठी तरुणांनीच हा लढा उभारावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
