वीस महिन्यांपासून फरार खून आरोपी अखेर जेरबंद; दोंडाईचा पोलिसांची मोठी कारवाई
सविस्तर बातमी
धुळे | प्रतिनिधी
शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे येथे सप्टेंबर २०२४ मध्ये घडलेल्या गाजलेल्या दीपक मालचे हत्या प्रकरणातील फरार आरोपीला अखेर पोलिसांनी जेरबंद केले आहे. तब्बल वीस महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा मुकेश मोरे याला दोंडाईचा पोलिसांनी अटक केल्याने या प्रकरणाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे.
१७ सप्टेंबर २०२४ रोजी शेवाळे येथे दीपक मालचे यांची निर्घृण हत्या झाली होती. या घटनेनंतर आरोपी मुकेश मोरे फरार झाला होता. पोलिसांकडून त्याचा सातत्याने शोध सुरू होता. दरम्यान, पोलीस निरीक्षक दिनेशा सोनवणे यांना आरोपीच्या हालचालींबाबत गोपनीय माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे उपनिरीक्षक इम्रान सेख आणि त्यांच्या पथकाने जुने कोळदे परिसरातील एका शेतात सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
अटकेनंतर आरोपीला पुढील तपासासाठी शिंदखेडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, या प्रकरणातील इतर बाबींचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या कारवाईमुळे फरार आरोपींवर पोलिसांची करडी नजर असल्याचा संदेश पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे.
#DhuleNews #Shindkheda #CrimeNews #BreakingNews #MurderCase #DondaichaPolice #DhuleCrime #MaharashtraNews #PoliceAction #NirbhidVichar #शिंदखेडा #धुळे #क्राईमन्यूज #ब्रेकिंगन्यूज #फरारआरोपी #पोलीसकारवाई
Dhule Crime News
Shindkheda Murder Case
Mukesh More Arrest
Deepak Malche Murder
Dondaicha Police News
Dhule Breaking News
Maharashtra Crime Update
Shewale Murder Case
फरार आरोपी अटक
धुळे क्राईम न्यूज
