शिरपूरच्या राजेंद्र भंडारी यांची विभागीय अध्यक्षपदी निवड
थाळनेर (प्रतिनिधी)
दिल्ली येथे ऑल इंडिया ऍग्रो डीलर असोसिएशन ची निवडणूक नुकतीच संपन्न झाली. या निवडणुकीत सामाजिक कार्यकर्ते व शिरपूर येथील श्री कृषी विकास केंद्राचे मालक राजेंद्रजी भंडारी यांची कार्याची दखल घेऊन सर्वांनी मते महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड व गोवा आदी राज्यांच्या विभागीय प्रभारी अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडी बद्दल धुळे जिल्हा सीड्स, पेस्टिसाइड व फर्टिलायझर्स डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष मानसिंग अण्णा गिरासे व जिल्ह्यातील सर्व संचालक मंडळ, शिरपूर तालुका कृषी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष हेमंत चौधरी व संचालक मंडळाने अभिनंदन केले.
