थाळनेरचा दर्शन सूर्यवंशी यूपीएससी परीक्षेत भारतातून 102 व्या क्रमांकवर उत्तीर्ण विभागीय वन अधिकारी म्हणून निवड

 




थाळनेरचा दर्शन सूर्यवंशी यूपीएससी परीक्षेत भारतातून 102  व्या क्रमांकवर उत्तीर्ण,, विभागीय वन अधिकारी म्हणून निवड 

थाळनेर (प्रतिनिधी)

थाळनेर येथील  दर्शन राजेंद्र सूर्यवंशी हा यूपीएससी दिल्ली मार्फत घेण्यात आलेल्या ''परीक्षेत विभागीय वन अधिकारी म्हणून निवड झाली आहे 

यूपीएससीच्या निकालात तो भारतातून 102 व्या क्रमांकवर ही परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. दर्शन हा अभियांत्रिकी पदवीधारक असून त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण निफाड येथील वैनतेय विद्यालयात झाले आहे. तो इयत्ता ४थी व ७ वीचा स्कॉलरशिप धारक विद्यार्थी असून त्याने इयत्ता दहावीला ९८.५५ टक्के मार्कस मिळावीले होते. शिवाय खोखोच्या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघातून त्याने उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे

त्याने दहावी नंतर मेकॅनिकल डिप्लोमा व्ही.जे.टी.आय. कॉलेज मुंबई येथून तर बी. ई. मेकेनिकल डिग्री ही पुण्यातून पूर्ण केली आहे. यापूर्वी इंटेलिजन्स ब्युरोची परीक्षा पास होऊनही अपेक्षित पोस्ट नसल्याने त्याने ती नोकरी नम्रपणे नाकारली होती. शिवाय तत्पूर्वी देखील ऍसेंचर या मोठ्या आयटी कंपनीने देखील त्याला नोकरी ऑफर केली होती.

दर्शनचे वडील राजेंद्र सूर्यवंशी हे वैनतेय ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सचे निवृत्त  प्राध्यापक असून त्याची 

आई शोभा सूर्यवंशी या  जि.प.च्या प्राथमिक शाळेच्या   निवृत्त शिक्षिका आहेत.

दर्शनच्या यशाबद्दल  न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त वि. दा. व्यवहारे, संस्थेचे विश्वस्त रतन पाटील वडघुले, किरण कापसे, राजेंद्र राठी, अॅड. दिलीप वाघवकर, राजेश सोनी, प्रभाकर कुयटे, मधुकर राऊत, विश्वास कराड, नरेंद्र नांदे, वैनतेय विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती मनीषा गुजराथी, उपप्राचार्य सुभाष खाटेकर, पर्यवेक्षक बी. बी. गुंजाळ, पर्यवेक्षिका श्रीमती आर. एम. लाहोटी आदींनी कौतुक केले. त्याच्या या यशाबद्दल थाळनेर येथील पीक संरक्षण सोसायटीचे चेअरमन एकनाथ जमादार, धुळे जिल्हा परिषदेत माजी कृषी सभापती नरेंद्रसिंग जमादार, थाळनेर विकास सोसायटी चे माजी चेअरमन दिनकरराव आनंदराव पाटील , शिरपूर तालुका कृषी विक्रेता संघाचे तालुकाध्यक्ष हेमंत चौधरी आधी सहगावकऱ्यांनी अभिनंदन केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने