महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड 2026 ने एकनाथ सावळे यांचा गौरव



 महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड 2026 ने एकनाथ सावळे यांचा गौरव 

थाळनेर (प्रतिनिधी)

नाशिक येथील ऍग्रो केअर ग्रुप ऑफ कंपनीज मार्फत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या ५० व्यक्तीचा सन्मान नुकताच करण्यात आला. यात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मंदाना भागात उप कृषी अधिकारी असलेले थाळनेरचे एकनाथ धनलाल सावळे यांना महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड २०२६ देऊन नाशिक येथे नुकताच गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शासन फलोत्पादन निवृत्त संचालक डॉ. कैलास मोते, पद्मश्री पुरस्कार प्राप्त चैत्राम पवार, नाशिकचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, नाशिकचे महाराष्ट्र शासन कृषी विभाग प्रकल्प संचालक (आत्मा) अभिमन्यू काशीद आदी होते. 

  ते थाळनेर येथील जमादार पाडा शाळेचे मुख्याध्यापक व सामाजिक कार्यकर्ते अमोल सावळे यांचे लहान बंधू आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने