*रोटरी स्कूल व ज्युनि. कॉलेजमध्ये डॉ. आंबेडकरांना अभिवादन*
दोंडाईचा मुस्तफा शाह
दोंडाईचा येथील श्रीमती मंदाकिनी टोणगांवकर रोटरी इंग्लिश स्कूल व ज्युनि. कॉलेजमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतीय जनतेला मौलिक संदेश देणारे थोर समाजसुधारक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. प्राचार्य श्री श्रुतिरंजन बारिक यांच्या हस्ते डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी समन्वयक श्री प्रशांत जाधव, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
तनिष्क शिंदे याने आपल्या भाषणातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर खडतर ज्ञानसाधना करून विधिशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र इत्यादी ज्ञानशाखांवर प्रभुत्व संपादन केले. माणूस फक्त ज्ञानामुळेच दुःखमुक्त होऊ शकतो, हे त्यांनी जाणले होते. डॉ. आंबेडकरांनी उच्च विद्याविभूषित होऊन आपल्या अन्यायग्रस्त समाजालाही न्याय मिळवून दिला. शिक्षणाशिवाय समाजविकास अशक्य आहे. शिक्षणामुळेच समतेवर आधारित समाजरचना निर्माण होऊ शकते. अशा शब्दांत डॉ. आबेडकरांचे विचार मांडले.
प्राचार्य श्री श्रुतिरंजन बारिक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र आणि साहित्य यातून आपल्याला मोलाचे संदेश मिळत असतात.
विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासूवृत्तीचे अनुकरण केल्यास शैक्षणिक जीवन उज्ज्वल होईल. असे मत मांडले. सूत्रसंचालन कु. मृणाली गिरासे हिने केले.
