भारत - अमेरीका व्यापार करारा विरोधात युथ कांग्रेसचे निवेदन
प्रतिनिधी, शिरपूर
भारतीय शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारा व कृषीपुरक व्यवसायाचा खात्मा करणारा भारत - अमेरीका शेतीसह अन्य व्यापार करार रद्द करण्याची मागणी युवक कांग्रेस च्या वतीने तहसिलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी युवक कांग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथी धुळे जिल्हा प्रभारी डॉ. शोएब पटेल यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की केंद्र सरकारने प्रस्तावित केलेला भारत - अमेरीका व्यापार करार हा देशातील शेतकरी, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मोडणारा आणि अन्न सुरक्षेला घातक असल्याचे म्हणत विदेशी कृषीमालावर शुन्य टक्के कर असल्याने बाहेरचा कृषीमाल मोठ्या प्रमाणात विक्री होईल तर देशातील कृषीमालाच्या किमती कोसळतील आणि शेतीमालाला भाव मिळणार नसल्याचे म्हटले गेले आहे. तसेच भारतातील शेतकरी अल्प भूधारक असून त्याला आधुनिक शेतीची जोड नाही व सरकारी मदतही तुटपुंजीच मिळते तर दुसरीकडे अमेरीकेतील मोठे सरकारी अनुदान मिळणाऱ्या आधुनिक शेतकऱ्यांसमोर भारतीय शेतकरी टिकणार नाही. त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती व किमान आधारभूत किंमत (एमएसपी) यांची उपयुक्तता कमी होण्यासह कृषीपुरक व्यवसाय, दुग्ध व्यवसाय प्रभावित होवून मोठ्या खासगी कंपन्यांचे वर्चस्व निर्माण होण्याचा धोका असल्याचे म्हटत सदर करार रद्द करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी प्रदेश युथ कांग्रेसचे सरचिटणीस डॉ. शोएब पटेल, मोहन पाटील, गेंद्या पावरा, जुनैद शेख, शिवाजी पावरा, ओंकार जाधव, सलीम पावरा आदी उपस्थित होते.
