"17 वर्षीय मानस सोनारची डिजिटल क्रांती: ग्रामीण प्रशासनासाठी स्मार्ट समाधान!"
नाशिक: अवघ्या १७ वर्षांच्या विद्यार्थ्याने ग्रामीण भारतातील डिजिटल दरी कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. मानस अर्चना हेमंत सोनार या युवकाने "मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान" अंतर्गत २० ते २५ ग्रामपंचायतींसाठी कार्यक्षम, सुलभ आणि नागरिकाभिमुख वेबसाइट्स तयार केली आहेत. या डिजिटल प्रकल्पामुळे ग्रामीण प्रशासनाची कार्यक्षमता वाढली असून, ६०,००० नागरिकांना थेट लाभ होत आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत शासकीय सेवा मिळवण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात जावे लागते, ज्यामुळे वेळ, श्रम आणि रोजच्या कामकाजावर परिणाम होतो. मानसला या समस्येचा प्रत्यक्ष अनुभव त्याच्या कुटुंबीयांच्या कामातून आणि गावी राहणाऱ्या लोकांच्या दृष्टीकोनातून मिळाला. त्याचे आई-वडील पंचायत क्षेत्राशी संबंधित असल्याने त्याला या अडचणींचा नजीकून अभ्यास करता आला.
याच अनुभवांवर आधारित मानसने डिजिटल प्रकल्पांची रचना केली जी वापरण्यास अत्यंत सोपी आणि उपयुक्त आहेत. वेबसाइट्समध्ये नागरिकांसाठी विविध शासकीय योजनांची माहिती, कर भरण्याची QR कोड सुविधा, तक्रार नोंदणी आणि सूचना देण्याची सोय उपलब्ध आहे. याशिवाय, गावातील विकासकामांची माहिती व छायाचित्रे देखील या वेबसाइट्सवर पाहता येतात, ज्यामुळे प्रशासनातील पारदर्शकता वाढली आहे.
मानस सोनारने तयार केलेल्या या डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा लाभ ५०,००० ते ६०,००० ग्रामीण नागरिकांना झाला आहे. विशेष म्हणजे, या वेबसाइट्समध्ये अपडेट्स करणे सोपे आहे आणि ग्रामपंचायत कर्मचारी तांत्रिक प्रशिक्षणाशिवाय त्यांना देखील सहजपणे त्या अपडेट करू शकतात.
मानस सोनारचा हा उपक्रम एक डिजिटल सक्षमीकरणाचे प्रेरणादायक उदाहरण ठरले आहे, जो ग्रामीण भारतातील सामाजिक व तांत्रिक बदलांसाठी एक प्रभावी नमुना बनला आहे. त्याच्या या कार्यामुळे इतर युवकांनाही समाजासाठी काहीतरी महत्त्वाचे करण्याची प्रेरणा मिळत आहे.
अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाने ग्रामीण भागा
#DigitalRevolution
#YouthInnovation
#RuralDigitalization
#SmartPanchayats
#TechForRuralIndia
#YouthEmpowerment
च्या शासकीय सेवेला दिला नवा आयाम या मुळे मिळत आहे.
