🚨 ब्रेकिंग न्यूज | नाशिक हादरले 🚨
‘भोंदू बाबा’चा विकृत चेहरा उघड! दोष निवारणाच्या बहाण्याने गर्भवतीवर बलात्कार
नाशिक प्रतिनिधी :
नाशिकमध्ये स्वतःला आध्यात्मिक गुरू म्हणवून घेणाऱ्या भोंदू बाबाचा संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अशोक खरात नावाच्या या व्यक्तीने ‘दोष निवारण’ विधीच्या बहाण्याने एका गर्भवती महिलेवर बलात्कार केल्याची गंभीर घटना समोर आली असून परिसरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
⚠️ ‘दोष निवारण’च्या नावाखाली सापळा
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला गर्भवती असताना तिला काही ‘अलौकिक दोष’ असल्याचे सांगत अशोक खरातने तिच्या कुटुंबाचा विश्वास संपादन केला.
पती घराबाहेर असताना विधी करण्यासाठी तिला एकटीला बोलावून घेत, तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.
😨 बनावट साप, वाघाची कातडी; भीतीचे राजकारण
खरात हा महिलांना घाबरवण्यासाठी बनावट साप, वाघाच्या कातड्याचा वापर करत असल्याची माहिती समोर आली आहे.
‘दोष दूर नाही केला तर अनर्थ होईल’ अशी भीती दाखवत तो महिलांना आपल्या जाळ्यात ओढत होता.
👮♂️ पोलिसांची कारवाई; गंभीर गुन्हा दाखल
या प्रकरणी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला असून अशोक खरातवर बलात्कारासह जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचे शोषण करणाऱ्या अशा भोंदू बाबांचा पर्दाफाश होणे अत्यंत गरजेचे आहे.विश्वासाच्या आड लपलेला हा विकृत चेहरा समाजासाठी मोठा धोका ठरत आहे.
घरात प्रकरण सध्या राज्यात जोरदार गाजत असेल या प्रकरणावरून मोठे राजकीय वादंग निर्माण झाले आहे, या प्रकारात रोज नवीन नवीन खुलासे होत असेल त्यांच्या गुन्ह्यांची मालिका सुरू झाली आहे. त्यामुळे हे प्रकरण पोलीस सोसायटी इन्कम टॅक्स इत्यादी सर्व विभाग कशाप्रकारे हाताळतात आणि त्यातून काय सत्य बाहेर येते याकडे आता राज्याचे लक्ष लागून आहे.
