सांगवी येथे टीबी रुग्णांना पोषण आहार वाटप

 


सांगवी येथे टीबी रुग्णांना पोषण आहार वाटप

थाळनेर (प्रतिनिधी)

थाळनेर टीयू अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये ‘टीबी मुक्त भारत’ अभियानांतर्गत टीबी रुग्णांना कोरड्या पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून ग्रामीण भागात आरोग्याबाबत जनजागृतीसह रुग्णांना आवश्यक पोषण मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सांगवी गावातील सरपंच गणिलाल हिर्मल पावरा, ग्रामसेवक राहुल बागुल तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घेत एकूण १५ टीबी रुग्णांना दत्तक घेऊन त्यांना पोषण आहाराचे वाटप केले.

याचप्रमाणे शेमाल्या गावातील सरपंच सौ. नेहा विजय पावरा व उपसरपंच सखाराम धुडकू पावरा यांनी २ रुग्णांना, तर लौकी गावातील सरपंच सौ. अक्काबाई भीमसिंग भील यांनी १ रुग्णाला पोषण आहार दिला.

करवंद येथील एमपीडब्ल्यू विनोद भास्कर देशमुख, लौकी येथील एमपीडब्ल्यू श्रीकांत साहेबराव बैसाने तसेच झेंडे अंजन येथील आशा वर्कर सोनाली विजय बोरसे यांनी प्रत्येकी १ टीबी रुग्णाला पोषण आहार देत या उपक्रमात सहभाग नोंदवला.

या उपक्रमामुळे टीबी रुग्णांना उपचारासोबतच आवश्यक पोषण मिळण्यास मदत होणार असून ‘टीबी मुक्त भारत’ अभियानाला गावपातळीवर बळ मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.


#TBFreeIndia

#HealthAwareness

#NutritionSupport

#RuralHealthcare

#PublicHealthCampaign

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने