Ai image..
गरताडमध्ये मुलीची छेडछाड; जाब विचारताच तलवार-कोयत्यांनी हल्ला, ४ जखमी
थाळनेर (प्रतिनिधी)
शिरपूर तालुक्यातील गरताड येथे मुलीची छेड काढल्याच्या प्रकारावर जाब विचारण्यासाठी गेलेल्या फिर्यादी व साक्षीदारांवर आरोपींकडून जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात चार जण गंभीर जखमी झाले असून थाळनेर पोलीस ठाण्यात तब्बल १५ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजय ठाणसिंग ब्राह्मणे (वय ३२, रा. गरताड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक १८ मार्च २०२६ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास प्लॉट परिसरात त्यांच्या व साक्षीदारांच्या मुलींना काही आरोपींकडून त्रास दिला जात होता. या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी व साक्षीदार आरोपींकडे गेले असता, आरोपींनी मनात राग धरून अचानक हल्ला चढवला.
या वेळी आरोपींनी तलवार, कोयता, कुऱ्हाड, लाठ्या-काठ्या व दगडांचा वापर करत फिर्यादी व साक्षीदारांवर जीव घेण्याच्या उद्देशाने मारहाण केली. या हल्ल्यात विनेश भीमराव मोरे, अंकुश ठाणसिंग ब्राह्मणे, माधवराव भाईदास मोरे व संदीप भाईदास मोरे हे जखमी झाले आहेत.
या प्रकरणी प्रवीण शंकर ठाकरे, बापू फतन ठाकरे, आशिष बापू ठाकरे, बबलू रामसिंग मोरे यांच्यासह एकूण १५ जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच शिरपूर उपविभागाचे पोलीस अधिकारी सुनील गोसावी तसेच थाळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हर्षल पाटील करीत आहेत.
#CrimeNews
#BreakingNews
#MaharashtraNews
#WomenSafety
#LawAndOrder
