नाशिक.युवराजसिंग राजपूत
अयोध्या कॉलनी परिसर, पाथर्डी फाटा, नाशिक येथील रहिवास्यांच्या वतीने दिनांक १ मार्च, २०२६ रोजी सायंकाळी नवनियुक्त नगरसेवक मा.बाळकृष्ण शिरसाठ, मा. भगवान दोंदे,मा. वैशाली ताई दळवी ,मा. माधुरी ताई डेमसे या प्रभाग ३१ मधील नवनिर्वाचित नगरसेकांचा एका शानदार कार्यक्रमात भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन किसनपाटील एखंडे यांनी प्रभावीपणे केले. सत्कारार्थीचे औक्षण सौ. नीलम लिटे, सौ. भाग्यश्री जाधव, अरुणा आहिरे, सौ. मनीषा कानडे यांनी केले. तर शॉल आणि श्रीफळ देऊन अंबादास सरोदे, राजू चौधरी, अभिजित लिटे, ताराचंद निनावे, सौ मिना एखंडे आणि सौ अनिता पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. दिपक पाटील, नरेंद्र कानडे, अहिरे सर व मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष युवराजसिंग राजपूत यांनी प्रातिनिधिक स्वरूपात या परिसरातील नागरी समस्यांवर भाष्य केले. त्यानंतर सर्व नगरसेवकांना येथील रहिवास्यांतर्फे सत्कार समारंभ संपल्यानंतर काॅलनितील विविध मागण्यांचे लेखी निवेदन देण्यात आले. यात मोठया व्यासाच्या पाण्याच्या पाईप लाईन टाकणे, रस्ते दुरुस्ती, स्ट्रॉबेरी शाळे समोरील ग्राऊंडला कंपाऊंड करून जॉगिंग ट्रॅक, ग्रीन जिम, मुलांची खेळणी, बगीचा इ. मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, जास्त वॅटच्या स्ट्रीट लाईट या व इतर अनेक मागण्या करण्यात आल्या.
सर्व चारही नवनिर्वाचित नगरसेवकांनी सत्काराला उत्तर देतांना पाणी, रस्ते, स्ट्रीट लाईट, स्ट्रॉबेरी समोरील ग्राउंडला वॉल कंपाऊंड, पेवर ब्लॉक लावून जॉगिंग ट्रॅक व त्यावर ग्रीन जिम,लहान मुलांना खेळणी, गार्डन इ. मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले. वरील मागण्या पूर्ण करण्यासाठी सर्व नगरसेवक एकत्रितपणे प्रयत्न करतील अशिही त्यांनी ग्वाही दिली.
कार्यक्रमासाठी मोठया प्रमाणात या परिसरातील महिला व पुरुष उपस्थित होते.
श्री. निनावे यांनी आलेल्या सर्व नवनियुक्त नगरसेवकांचे व कॉलनीतील जमलेल्या सर्वांचे आभार माणुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
