सेवेचा नवा संकल्प : शिरपूरमध्ये जायण्ट्सच्या तीन ग्रुपांचा संयुक्त शपथविधी सोहळा”

 


सेवेचा नवा संकल्प : शिरपूरमध्ये जायण्ट्सच्या तीन ग्रुपांचा संयुक्त शपथविधी सोहळा”





शिरपूर : सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव यांची परंपरा जपणारी १९७२ पासून कार्यरत असलेली Giants Welfare Foundation या समाजसेवी संस्थेच्या फेडरेशन २ अ / युनिट ४ अंतर्गत बालाजी सिटी कपल्स ग्रुप, लक्ष्य सखी ग्रुप आणि सावित्री सखी ग्रुप यांचा संयुक्त पदग्रहण व शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.


शिरपूर येथील Mukeshbhai Patel Town Hall येथे आयोजित या सोहळ्यास सामाजिक, प्रशासकीय व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

उदारता, एकात्मता, क्रियाशीलता, सभ्यता, सत्यता व सेवा या सूत्रांवर चालणाऱ्या जायण्ट्स संस्थेच्या नव्या पदाधिकाऱ्यांनी समाजकार्यासाठी स्वतःला समर्पित करण्याची शपथ घेतली.

अध्यक्षपदाची शपथ श्री. वृक्षमित्र शिवाजी लोटन राजपूत (अध्यक्ष – कपल्स ग्रुप)

सौ. संध्या सचिन जैन (अध्यक्षा – लक्ष्य सखी ग्रुप)

सौ. निकिता प्रांजल सोनार (अध्यक्षा – सावित्री सखी ग्रुप)

या तिघांनी सामाजिक कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.


कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. भीमलिंगजी शिवलिंग लिंभारे (फेडरेशन अध्यक्ष) होते. प्रमुख अतिथी म्हणून दादासो. रवींद्र जमादार, प्रांताधिकारी मा. शरदजी मंडलिक, तहसीलदार मा. महेंद्रजी माळी, सी.ओ. मा. प्रशांतजी सरोदे, बी.डी.ओ. मा. प्रदीपजी पवार, पी.आय. मा. किशोरजी परदेशी, माजी नगराध्यक्षा मा. जयश्रीजी पटेल, उपनगराध्यक्षा मा. संगीता देवरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

फेडरेशनचे पदाधिकारी मा. किरणजी शेवाळे (एमिजिएट पास्ट फेडरेशन अध्यक्ष), मा. श्रीरामजी सोनवणे (युनिट डायरेक्टर – युनिट ४), मा. ज्योतीजी सोनवणे (समन्वयक), मा. कनिकाजी सुखवाणी (ऑफिसर), मा. जितेंद्रजी पाटील (ऑफिसर), चंद्रकांत (ऑफिसर), मा. मानसीजी बाविस्कर (ऑफिसर) यांचीही उपस्थिती लाभली.


तीनही ग्रुपांच्या कार्यकारिणी सदस्यांनी शपथ घेऊन पदभार स्वीकारला.

कपल्स ग्रुप, लक्ष्य सखी ग्रुप आणि सावित्री सखी ग्रुपच्या उपाध्यक्ष, सचिव व खजिनदार पदांवर नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली.

यावेळी वृक्षमित्र शिवाजी राजपूत, सौ. निकिता सोनार व सौ. संध्या जैन यांनी मनोगत व्यक्त करत समाजातील गरजू घटकांसाठी आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण, महिला सक्षमीकरण आणि शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला.


कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन कनिकाजी सुखवाणी व श्री. प्रदीप गहिवरे यांनी केले. उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात हा सोहळा संपन्न झाला.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने