आश्रमशाळा वाघाडी येथे आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न*



 *आश्रमशाळा वाघाडी येथे आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न* 

आज दिनांक 24 मार्च 2026 रोजी आमच्या आर.सी.पटेल अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा वाघाडी येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण धुळे यांच्यावतीने ग्रामसंजीवनी प्रतिष्ठान अहिल्यानगर  यांच्यामार्फत आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे प्राचार्य श्री के.जे.राजपूत व मुख्याध्यापक श्री बी.बी. सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. ग्राम संजीवनी प्रतिष्ठान अहिल्यानगर यांच्यावतीने श्री जितेंद्र सोनवणे आणि श्रीमती भाग्यश्री बडगुजर यांची प्रमुख उपस्थिती व अत्यंत मोलाचे तसेच व्यावहारिक मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्राचार्य श्री के.जे.राजपूत व मुख्याध्यापक श्री बी.बी. सोनवणे यांनी आलेल्या दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे बुके देऊन स्वागत केले. त्यानंतर श्रीमती भाग्यश्री बडगुजर यांनी वेगवेगळ्या आपत्तीच्या प्रसंगी कशा पद्धतीने प्रसंगावधान साधून आपत्तीग्रस्त व्यक्तीची मदत करावी याचे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या सहभाग घेऊन प्रात्यक्षिक सर्व विद्यार्थ्यांसमोर करून दाखवले. त्याचप्रमाणे श्री जितेंद्र सोनवणे यांनी पाण्यापासून आपण आपला जीव कसा वाचवावा व इतरांची मदत कशी करावी या संदर्भात मार्गदर्शन व प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखवले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे प्राचार्य श्री के.जे.राजपूत यांनी आलेल्या दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे उत्तम असे प्रात्यक्षिक दाखवल्याबद्दल शाळेच्या वतीने आभार व्यक्त केले. तसेच मुख्याध्यापक श्री बी.बी.सोनवणे यांनी देखील आलेल्या दोन्ही मान्यवरांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री भूषण पेंढारकर यांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने