🚨 ब्रेकिंग : “दुधात फॉर्मालिनचा स्फोटक आरोप; शिरपूरात खळबळ, प्रशासनाचा खुलासा”
करवंद प्रकरणानंतर भीतीचं वातावरण; अन्न व औषध प्रशासन म्हणतं – ‘वृत्ताचा गैरसमज’
शिरपूर (प्रतिनिधी) –
शिरपूर तालुक्यातील करवंद येथील दुधात घातक फॉर्मालिन रसायन आढळल्याच्या वृत्तामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. “एका प्रसिद्ध दैनिकांमध्ये” मध्ये प्रसिद्ध झालेल्या या बातमीनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून दूध विक्रेत्यांविषयी संशय व्यक्त केला जात होता.
या प्रकरणात धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील करवंद येथील लक्ष्मीबाई वाघ यांनी विकत घेतलेल्या दुधाचा नमुना तपासणीसाठी पाठवण्यात आला होता.
त्यांनी विकत घेतलेल्या दुधात प्लास्टिकचे गोळे निर्माण झाले की बातमी काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले होते. ही बातमी राज्यभर व्हायरल झाले होती. आता या प्रकरणाच्या तपासणी अहवाल समोर आल्यानंतर प्रयोगशाळा अहवालात दुधात फॉर्मालिन आढळल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच दुधातील फॅट प्रमाणही अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे नमूद करण्यात आले होते.
दरम्यान, या प्रकरणावर अन्न व औषध प्रशासन विभागाने अधिकृत पत्राद्वारे स्पष्टीकरण दिले आहे. सहाय्यक आयुक्त (अन्न), धुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार –
👉 नमुना तपासणी प्रक्रियेदरम्यान फॉर्मालिनचा वापर ‘Preservative’ (संरक्षक द्रव्य) म्हणून केला जातो.
👉 दूध खराब होऊ नये म्हणून नमुना संकलन करतानाच ठराविक प्रमाणात फॉर्मालिन मिसळले जाते.
👉 त्यामुळे प्रयोगशाळा अहवालात फॉर्मालिन आढळणे हे भेसळ सिद्ध होत नाही.
प्रशासनाने स्पष्ट केलं की, या प्रकरणात दुधात जाणीवपूर्वक घातक रसायन मिसळल्याचा कोणताही निष्कर्ष काढण्यात आलेला नाही.
वृत्तानंतर नागरिकांमध्ये दूध सुरक्षिततेबाबत भीती निर्माण झाली होती. विभागाने स्पष्ट केले आहे की,
सदर म्हशीचे दूध अन्न विश्लेषक अन्न चाचणी प्रयोगशाळा, संभाजीनगर यांनी अप्रमाणित घोषित केले आहे. त्यामध्ये मिल्क फैट ४.३ % जे कमीत कमी ५.० % असणे गरजेचे होते . इतर कोणतीही भेसळ आढळून आली नाही
सदर प्रकरणी जबाबदार व्यक्ती विरुद्ध कंपाऊंडिंग केस क्रमांक १३/२०२६, १०.०२.२०२६ दाखल झालेली आहे.
त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या खुलाशानंतर प्रकरणाला पूर्णविराम मिळताना दिसत आहे.
अन्न व औषध प्रशासनाने माध्यमांना आवाहन केले आहे की,
👉 अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीवर आधारित बातम्या प्रसिद्ध करू नयेत.
👉 नागरिकांमध्ये अनावश्यक भीती पसरू नये याची दक्षता घ्यावी.
करवंद येथील दुधाच्या नमुन्यावरून उभं राहिलेलं हे प्रकरण आता “भेसळ की गैरसमज?” या टप्प्यावर पोहोचलं होते मात्र या वृत्ताबाबतच्या गैरसमज अधिकृतपत्रांमुळे विभागाने दूर केला असून नागरिकांनी घाबरून न जाता , सत्यता तपासावी व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.
#Shirpur
#MilkAdulteration
#FormalinScam
#FoodSafety
#BreakingNews
🔍 SEO Keywords:
शिरपूर दुध भेसळ प्रकरण
दुधात फॉर्मालिन आढळले
Shirpur milk adulteration news
Formalin in milk Maharashtra
Food safety department Shirpur
दूध तपासणी अहवाल
Maharashtra milk contamination case
Shirpur breaking news milk scam
