नंदुरबारला अखेर पालकमंत्री मिळाले; हसन मुश्रीफ यांच्यावर जबाबदारी
📰 बातमी:
नंदुरबार : राज्याच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून, गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त असलेले नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अखेर भरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
माजी पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शासकीय सदनिका प्रकरणात राजीनामा दिल्यानंतर डिसेंबर 2025 पासून हे पद रिक्त होते. आता मुश्रीफ यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील प्रशासनाला स्थैर्य मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळख असलेले हसन मुश्रीफ यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते कॅबिनेट मंत्रीपदापर्यंतचा प्रवास केला आहे.
#Nandurbar
#HasanMushrif
#GuardianMinister
#MaharashtraPolitics
#BreakingNews
