शिरपूर तालुका पोलिसांची महामार्गावर ड्रग्स कारवाई; 37 लाखांचा गांजा-अफू साठा जप्त!”

 



शिरपूर तालुका पोलिसांची महामार्गावर ड्रग्स कारवाई; 37 लाखांचा गांजा-अफू साठा जप्त!”




शिरपूर (दि. 18 मार्च 2026) – 


धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर असलेल्या हॉटेल व धाब्यांवर पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत तब्बल 37 लाख 45 हजार 965 रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.



पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, पळासनेर परिसरातील काही धाब्यांवर गांजा व डोडा (अफूजन्य पदार्थ) साठवून त्याची विक्री सुरू आहे. या माहितीची खातरजमा करून त्यांनी तात्काळ धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना कळवून छापा टाकण्याची परवानगी घेतली.

यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलिसांनी चार स्वतंत्र पथके तयार केली. पंच, वजनकाटा धारक व छायाचित्रकार यांच्या उपस्थितीत मध्यरात्री सुमारे 11.30 वाजता एकाच वेळी विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले.



 तीन धाब्यांवर एकाच वेळी कारवाई करत

पोलिसांनी  छापे टाकत हॉटेल जय बाबारी,जय मातादी ढाबा अँड रेस्टॉरंट, रामदेव बाबा हॉटेल या ठिकाणी करण्यात आलेल्या झडतीत आरोपींच्या ताब्यातून गांजाचा चुरा व सुकलेला गांजा अफूची पावडर (डोडा) अफूच्या बोंडाचे तुकडे असा एकूण 224.699 किलो वजनाचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला.


या प्रकरणी पोलिसांनी भल्ला चारण भरवाड,गोपाळ रघु भरवाड लाला गांगू भरवाड, सर्व  राहणार चारणपाडा, पळासनेर, ता. शिरपूर)

या तिघांना ताब्यात घेतले आहे.



पोलीस हेडकॉन्स्टेबल शेखर बागुल यांच्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 103/2026 नोंद करण्यात आला आहे. आरोपींवर NDPS कायदा कलम 8(क), 17(क), 20(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सदर कारवाई श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक सो, धुळे,  अजय देवरे, अपर पोलीस अधीक्षक,

धुळे, सुनिल गोसावी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर विभाग शिरपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस

निरीक्षक जयपाल हिरे, पोसई सुनिल वसावे, पोसई मनोज कचरे, पोसईं मिलींद पवार, पोहेकॉ  शेखर

बागुल, पोहेकॉ  राजु ढिसले, पोहेकॉ संतोष पाटील, पोहेकॉ संदिप ठाकरे, पोहेकॉ  सुनिल पाठक,

पोहेकॉ अनिल चौधरी, पोकॉ कृष्णा पावरा, पोकॉ दिनकर पवार, पोकॉ  योगेश मोरे, पोकॉ  स्वपनिल बांगर. पोकॉ विजय ढिवरे, पोकॉ  बडगुजर पोकॉ/ शिवाजी वसावे, पोकॉ  जयेश मोरे, चापोहेकॉ अल्ताफ मिर्झा चापोकॉ  फारुकी अशांनी केली आहे.


या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील वसावे करत असून, या रॅकेटचे आणखी धागेदोरे उलगडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



#ShirpurCrime

#DrugBust

#NDPSAction

#DhulePolice

#BreakingNews


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने