प्रा.डॉ. अनिता जाधव यांना ‘दामिनी राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान



 प्रा.डॉ. अनिता जाधव यांना ‘दामिनी राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान


शिरपूर (प्रतिनिधी):


शिरपूर येथील आर.सी. पटेल एज्युकेशन ट्रस्ट संचालित आर.सी. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या प्रा. डॉ. अनिता जाधव यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘दामिनी राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी पत्रकार संघाकडून हा पुरस्कार दिला जातो. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली.

प्रा. डॉ. अनिता जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने केलेले मार्गदर्शन, विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांमध्ये घेतलेला सक्रिय सहभाग तसेच संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य यामुळे त्या नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. त्यांच्या कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दिशा व प्रेरणा मिळाली आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी, दि. १५ मार्च रोजी नाशिक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला मा. सौ. हिमगौरी आठके-अहेर, प्रा. डॉ. अमित केले (किम्स मानवता हॉस्पिटल, नाशिक), सौ. जयश्रीताई बोरसे (नगरसेविका), अपर्णा शेटे-तनवर (कार्यकारी संपादक, दैनिक लोकमत), अश्विनी अत्रे (मिसेस इंडिया, दुबई), संध्या मिलिंद खेडेकर (प्राचार्य, एच.पी.टी. महाविद्यालय), डॉ. अशाताई पाटील (राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष, ग्राहक सेवक समिती), भारतीताई पवार (माजी केंद्रीय राज्यमंत्री), प्रा. अजय बोरस्ते (नगरसेवक व महानगर प्रमुख, शिवसेना), तसेच लोककला साहित्यिक व समुपदेशक प्रा. डॉ. शोभा सातभाई आदी मान्यवर उपस्थित होते.

या यशाबद्दल शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व माजी मंत्री आ. अमरीशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव सौ. रेषा पटेल, प्राचार्य डॉ. हितेंद्र महाजन, उपप्राचार्य डॉ. ए. एम. पाटील, डॉ. आर. डी. जाधव तसेच सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

प्रा. डॉ. अनिता जाधव यांना मिळालेल्या या राष्ट्रीय सन्मानामुळे शिरपूरच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची भावना निर्माण झाली असून, त्यांच्या कार्यावर शैक्षणिक, सामाजिक व पत्रकार क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने