मतदार यादी जुळवणीसाठी शिरपूरात विशेष मोहीम; घरपोच तपासणी सुरू” बीएलओंची घरोघरी भेट; 2002 च्या यादीशी नाव जुळवणे अनिवार्य — पुरावा न दिल्यास नाव वगळण्याची शक्यता

 


“मतदार यादी जुळवणीसाठी शिरपूरात विशेष मोहीम; घरपोच तपासणी सुरू”


बीएलओंची घरोघरी भेट; 2002 च्या यादीशी नाव जुळवणे अनिवार्य — पुरावा न दिल्यास नाव वगळण्याची शक्यता


📰 शिरपूर (प्रतिनिधी):


शिरपूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) सध्या ऐन उन्हात घरोघरी जाऊन मतदारांच्या नावांची पडताळणी करीत आहेत.


या मोहिमेअंतर्गत 2024 च्या मतदार यादीतील नावांचे 2002 च्या जुन्या मतदार यादीशी जुळवणी (मॅपिंग) करण्यात येत आहे. तसेच, मतदार यादीतील अस्पष्ट छायाचित्रे, चुकीची माहिती आणि इतर त्रुटी दुरुस्त करण्याचे कामही सुरू आहे.


ही संपूर्ण प्रक्रिया उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक आणि तहसीलदार महेंद्र माळी यांच्या मार्गदर्शनाखाली युद्धपातळीवर राबवली जात आहे.


तहसील कार्यालयाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की,

ज्या मतदारांचे नाव 2002 च्या यादीत नव्हते, त्यांनी

आई, वडील किंवा आजोबांची माहिती उपलब्ध करून द्यावी

बीएलओ दोन ते तीन वेळा घरी भेट देणार आहेत

आवश्यक कागदपत्रे न दिल्यास  मतदार यादीतून नाव वगळले जाऊ शकते.


विवाहित महिलांनी (सुनांनी) त्यांच्या आई-वडिलांची माहिती तयार ठेवावी आवश्यक तपशील:

नाव,2002 मधील राहण्याचे ठिकाण,विधानसभा मतदारसंघ,मतदार यादी क्रमांक, अनुक्रमांक

ही माहिती बीएलओकडे सादर करणे बंधनकारक आहे.


मतदार यादीतील अचूकता सुनिश्चित करण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून आपले नाव यादीत कायम ठेवण्यासाठी आवश्यक माहिती वेळेत सादर करावी, असे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने