*पणन व राजशिष्टाचार तथा धुऴे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. जयकुमारभाऊ रावल यांची नरडाणा येथील शिव पेट्रोल पंपास सदिच्छा भेट*
नरडाणा - राज्याचे पणन व राजशिष्टाचार तथा धुऴे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. जयकुमारभाऊ रावल यांची नरडाणा येथील शिव पेट्रोल पंपास सदिच्छा भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवसी दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी भाजपा अनु. जाती मोर्चा मा. जिल्हाध्यक्ष तथा पंप संचालक प्रताप सरदार, भुपेंद्र पाटील, सुनिल बाफना यांचा नरडाणा वारुड दरम्यान असलेल्या शिव पेटोल पंपास ना. रावल यांनी भेट दिली असता याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त प्रतिमा पुजन मंत्री ना. रावल यांनी केली. तर भाजपा अनु. जाती मोर्चा मा. जिल्हाध्यक्ष तथा पंप सचालक प्रताप सरदार, भुपेंद्र पाटील, सुनिल बाफना यांनी मंत्री ना. रावल यांचे स्वागत सत्कार केला. तर मंत्री ना. रावल यांनी याप्रसंगी शुभेच्छा व सदिच्छा दिल्यात. यावेऴी परिसरातील भाजपाचे माजी जिप सदस्या सौ. संजिवनीताई सिसोदे, माजी जिप सदस्य नथ्थु आबा वारुडे, शिंदखेडा ग्रामिण भाजपा अध्यक्ष मोतीलाल नाना वाकडे, सिध्दार्थ सिसोदे, विनित सिसोदे, दिव्यस वारुडे, भटुशेठ बाफना, प्रणितशेठ बाफणा, निशांत बोरसे, हर्षल जैन, पंपचे मँनेजर मराठे सह आदि पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक व पंपाचे कर्मचारी उपस्थित होते.
