माझी वसुंधरा अभियान ५.०” अंतर्गत महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक पटकावत बोराडीच्या मुकुटात मानाचा आणखी एक तुरा... महाराष्ट्र राज्य पर्यावरण व वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरित...

 


माझी वसुंधरा अभियान ५.०” अंतर्गत महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक पटकावत बोराडीच्या मुकुटात मानाचा आणखी एक तुरा... 

       महाराष्ट्र राज्य पर्यावरण व वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरित...

 राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आवाहन : रासायनिक खतांचा वापर टाळून प्राकृतिक शेतीकडे वळा...


 

बोराडी -रासायनिक खतांचा वापर करून उत्पादित अन्नाचे सेवन केल्यामुळे मधुमेह, हृदयविकार, सांधेदुखी यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता व्यक्त केली. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे.

रासायनिक शेतीमुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून जमिनीतील उपयुक्त जीवजंतू नष्ट होत आहेत. विशेषतः गांडूळ हे शेतकऱ्यांचे खरे मित्र असून विविध रासायनिक खते व विषारी फवारणीमुळे त्यांची संख्या झपाट्याने घटत आहे. गांडुळांच्या अभावामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही, ते वाहून जाते आणि माती कडक बनते. ज्या शेतांमध्ये गांडुळे आढळतात, त्या ठिकाणी पाणी खोलवर मुरते व जमीन अधिक सुपीक राहते, असेही त्यांनी स्पष्ट केले.देशातील निसर्ग आणि शेती वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी प्राकृतिक शेतीचा अवलंब करावा, असे आवाहन महाराष्ट्र व गुजरात राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी 


बोराडी ग्रामपंचायतीच्या विकासाच्या वाटचालीत आज पुन्हा एकदा सुवर्णक्षणाची नोंद झाली आहे. आदिवासी बहुल भागातील हे छोटेसे गाव आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे राज्य आणि देशपातळीवर ओळख निर्माण करत आहे. “माझी वसुंधरा अभियान ५.०” अंतर्गत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावत बोराडीच्या मुकुटात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. या यशाबद्दल ग्रामस्थांमध्ये अभिमान व आनंदाचे वातावरण आहे.


बोराडी ग्रामपंचायतीने गेल्या काही वर्षांत स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, ग्रामविकास आणि प्रशासनातील पारदर्शकता यावर विशेष भर दिला. त्याचे फलित म्हणून गावाला आजपर्यंत अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. विभागस्तरीय निर्मल ग्राम पुरस्कार (२००७), जिल्हास्तरीय आर. आर. पाटील सुंदर ग्राम पुरस्कार (२०२०), विभागस्तरीय संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार (२०२२), राज्यस्तरीय प्रथम – माझी वसुंधरा अभियान ३.० (२०२४), राज्यस्तरीय तृतीय – माझी वसुंधरा अभियान ४.० (२०२४) आणि राज्यस्तरीय प्रथम – राजीव गांधी गतिमान प्रशासन पुरस्कार (२०२५) अशा विविध सन्मानांनी बोराडीचा गौरव वाढविला आहे. या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे गावाचे नाव राज्यात आणि देशात उज्ज्वल झाले आहे.


याच परंपरेत यंदा “माझी वसुंधरा अभियान ५.०” मध्ये राज्यात द्वितीय क्रमांक मिळवत बोराडी ग्रामपंचायतीने १.२५ कोटी रुपयांचे बक्षीस प्राप्त केले. मुंबई येथे झालेल्या भव्य समारंभात महाराष्ट्र व गुजरात राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत, यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार , विधानसभा अध्यक्ष अँड राहुल नार्वेकर,कौशल्य रोजगार उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा,पर्यावरण व वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे,माहीती व तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड आशिष शेलार ग्रामविकास व पंचायतराज विभाग मंत्री जयकुमार गोरे,महापौर बृहन्मुंबई रितु तावडे,संसद सदस्य अरविंद सावंत, विधानपरिषद सदस्य सचिन अहीर,वि.प. सदस्य सुनिल शिंदे, विधानसभा सदस्य आदीत्य ठाकरे,म.प्र.नि.मंडळ अध्यक्ष सिध्देश्वर कदम, महाराष्ट्र राज्य मुख्य सचिव राजेश अग्रवाल,पर्यावरण व वातावरण विभाग सचिव जयश्री भोज,राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे सहसचिव रामकृष्ण इतर मान्यवर मंत्र्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा क्षण बोराडीकरांसाठी अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणादायी ठरला.


    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यावरण व वातावरण विभाग सचिव जयश्री भोज आपण केवळ प्रशासकीय उत्कृष्टिकतेची दखल घेत नाही तर आपण आज हवामान बदलाच्या अग्रभागी कार्य करणाऱ्या नेतृत्वावर प्रकाश ज्योत टाकता आहे केवळ एक साधन म्हणून नव्हे तर महाराष्ट्राच्या भविष्यासाठी एक संरक्षण कवच म्हणून कार्यकर्ता हा सन्मान सोहळा स्थान पातळीवरील यशाच्या राज्यस्तरीय परिवर्तनासाठी प्रभाग प्रभावी उपयोग होत असल्याचे सांगितले.


पुरस्कार स्वीकारताना धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रदीप पवार, बोराडीचे सरपंच सुखदेव भिल, उपसरपंच राहुल रंधे, ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र साळुंखे, विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर पेंढारकर तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. अभियानातील शिलेदार आंबादास सगरे, गणेश भामरे, गजू पाटील, गौरव चौधरी, मुकेश जाधव, भूषण कुलकर्णी, चंद्रकांत बडगुजर, समाधान नगराळे, चंद्रकांत राजपूत, प्रकाश वाल्हे, उमेश पावरा,बादल पावरा,विजय पावरा, अमोल बडगुजर, शरद पवार, सनी चव्हाण, संतोष न्हासदे, दिपक कोळी, तुषार गोपाळ, विशाल पावरा, विशाल पवार, सागर बडगुजर, आदींनीही या यशात मोलाचा वाटा उचलला.


आदिवासी भागातील ग्रामपंचायत असूनही बोराडीने विकासाच्या क्षेत्रात नवे आदर्श निर्माण केले आहेत. पर्यावरण संरक्षण, वृक्षारोपण, जलसंधारण, स्वच्छता मोहिमा, प्लास्टिकमुक्ती, सौरऊर्जा वापर अशा विविध उपक्रमांतून गावाने प्रगतीची नवी दिशा दाखवली आहे. सरपंच सुखदेव भिल व उपसरपंच राहुल रंधे यांच्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतून आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने बोराडी गाव समृद्धीकडे वाटचाल करताना दिसत आहे.


बोराडीचे हे यश केवळ एका पुरस्कारापुरते मर्यादित नसून, ग्रामीण विकासाच्या आदर्श मॉडेलचे प्रतीक आहे. सातत्य, पारदर्शकता आणि सामूहिक सहभाग यांच्या बळावर बोराडी ग्रामपंचायत भविष्यातही अशीच यशस्वी भरारी घेईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.


महाराष्ट्र व गुजरात राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत, पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र व गुजरात राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वापर कमी करून प्राकृतिक शेतीकडे वळण्याचे आवाहन केले.


यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, देशातील हवामान बिघडण्यामागे रासायनिक खतांचा अतिरेक वापर हे एक महत्त्वाचे कारण आहे. शेतात टाकण्यात येणाऱ्या युरिया व डीएपीसारख्या खतांपैकी केवळ ३० ते ३५ टक्के अंश पिकांना मिळतो, व उर्वरित खत पाण्यात मिसळून पर्यावरणाला हानी पोहोचवते. या प्रक्रियेमुळे जमिनीची सुपीकता घटते तसेच पाणी आणि माती प्रदूषित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने