*शिवाजी महाराज हे इतिहासातील सर्वश्रेष्ठ हिरा व राजे आहेत : प्रा. सतीश अहिरे*
शिरपूर तालुक्यातील नवीन आढे येथे अक्षल फाउंडेशन,धुळे यांच्या वतीने ३९७ साव्या शिवजयंती निमित्ताने शिवचरित्र व्याख्यानांचा कार्यक्रमाचे आयोजन बसस्टॅण्ड परिसरात करण्यात आले होते.
कार्यक्रमाचा सुरवातीला महाराणा प्रताप,महात्मा फुले,वीर एकलव्य,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतीमा यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली.सुरुवातीला धुळे येथील प्रसिद्ध शाहीर मनोज नगराळे,हर्ष मोरे,राज पगारे यांनी शाहीर व गीत सादर केलीत.धुळे येथील प्रसिद्ध व्याख्याते प्रा.सतीश अहिरे यांनी व्यख्यानात सांगितले कि,हिंदवी स्वराज्याचे निर्माण करतांना जात,धर्म,पंथ न मानता सर्व जातीचा लोकांना सोबत घेऊन मुघल सत्तेशी लढा देऊन आपले साम्राज्य निर्माण केले.पर स्त्रीला माता मानले.इतिहासातील कालखंडातील चरित्र संपन्न अद्वितीय राजे माता जिजाऊ यांचा चांगल्या संस्कारातून घडले होते.यामुळे आजही ते सर्वश्रेष्ठ हिरा व राजे आहेत.असा राजा होणे नाही.असे आपल्या व्याख्यानात त्यांनी मत मांडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस पाटील राजकिरण राजपूत, प्रमुख अतिखी म्हणून माजी उपसरपंच योगेश पाटील,विकासो चेअरमन दगडू पाटील,अक्षय फाउंडेशनचे अध्यक्ष अँड अमोल शिरसाठ,तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रसिंग गिरासे,माजी उपसरपंच सुनील शिरसाठ,माजी ग्रा.पं.सदस्य एकनाथ भिल,दिलीप शिरसाठ,गोटू सोनवणे,प्रवीण शिरसाठ,भैय्या सोनार,मांगू भिल,सुरेश सोनवणे, वाल्मिक शिरसाठ,विलास शिरसाठ,श्रीकांत अमुतसागर,सागर शिरसाठ,विक्की थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड अमोल शिरसाठ,सूत्रसंचालन महेंद्र शिंदे, आभारप्रदर्शन योगेश पाटील यांनी केले.कार्यक्रमात मान्यवरांना ट्रॉफी,शाल,श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.गाकऱ्यांचा वतीने अक्षल फाउंडेशनचे अध्यक्ष अँड शिरसाठ यांच्या सत्कार करण्यात आला.व्याख्यानात मोठया संख्येने लोकांची उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंचशील मित्र मंडळ व शिवबा मित्र मंडळ आणि अक्षल फाउंडेशन,धुळे यांच्या पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
