चिमठाणे अत्याचाराविरोधात बिरसा आर्मीचे निवेदन; संशयितांवर गुन्हा दाखल

 


चिमठाणे अत्याचाराविरोधात बिरसा आर्मीचे निवेदन; संशयितांवर गुन्हा दाखल


प्रतिनिधी, शिरपूर

             सुरूची विद्यालय व ज्युनीयर कॉलेज शिंदथेडा येथे अल्पवयीन मलींवरील अत्याचारा विरोधात बिरसा आर्मी संघटनेने मुख्यमंत्री, गृहमंत्री व जिल्हा पोलीस अधीक्षांना दिलेल्या निवेदनातून आरोपिंना जामीन न होणे, शाळेची मृत्युदंडाची शिक्षा होण्याची मागणी केली. दरम्यान संशयित आरोपिंवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल झाला. 

          बिरसा आर्मी व विद्यार्थीनिंच्या पालकांनी चिमठाणे ता. शिंदखेडा येथे अल्पवयीन मुलींवर झालेल्या अतिप्रसंगाचा निषेध करत गृह मंत्रालय, जिल्हा पोलीस खाते व आदिवासी विकास विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सुरूची विद्यालय चिमठाणे ता. शिंदखेडा जि. धुळे येथील निवासी शाळेत आदिवासी अल्पवयीन मुली शिक्षण घेतात. मात्र कोवळ्या वयातील किशोरवयीन मुलींची छेड काढणे, अंगलट येणे, लज्जास्पद वर्तन करणे असा विकृत प्रकार मागील 2-3 वर्षांपासून सुरू असल्याचे म्हटले आहे. आता मात्र परीसिमा गाठून विजय भास्कर कोळी नावाचा वासनांध अधीक्षक हा विद्यार्थीनिंवर अतिप्रसंग केला. तर संस्थेचा चेअरमन चौधरी हा कोळीची पाठराखण करत होता. हा स्रर्व प्रकार चेअरमन आणि कोळींसारखे काही नराधम कर्मचारी यांच्या आपसी संगनमताने चालु आसल्याचे म्हटले असून संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, जिल्हा पोलीस अधीक्षक, डीवायएसपी शिरपूर भाग, पोलीस निरीक्षक शिंदखेडा यांना दिलेल्या निवेदनातून आरोपिंना जामीन न मिळणे, खटला जलदगती न्यायालयात चालवणे व मृत्युदंडाच्या शिक्षेची मागणी केली गेली. तर मंत्री आदिवासी विकास विभाग, आयुक्त आदिवासी विकास विभाग व प्रकल्प अधिकारी धुळे यांना दिलेल्या निवेदनातून शाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी केली आहे. दरम्यान शिंदखेडा पोलीस ठाणे येथे विजय भास्कर कोळी रा. पाडळसे ता. अमळनेर जि. जळगाव, सुभाष दिनेश चौधरी रा. चिमठाणे ता. शिंदखेडा जि. धुळे, प्रतिभा देसले, योगिता महाले दोन्हीही रा. शिंदखेडा यांच्यावर पोक्सो अधिनियम 2012 चे कलम 8,10,12, 21(2), बीएनएस 2023 चे कलम 75 व एट्रॉसिटी कायदा (3)(1)(w) (i) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. 3 आरोपी अटक आहे तर एक आरोपी महिलेचा पोलीस शोध घेत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने