पोलिस–पत्रकारांच्या आरोग्यासाठी पुढाकार
चंदन आबा फाऊंडेशन व दैनिक राष्ट्र उदयचा स्तुत्य उपक्रम
शिरपूर | प्रतिनिधी
राष्ट्रसेवा बजावत असताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणाऱ्या पोलिस व पत्रकार बांधवांसाठी एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.
चंदन आबा फाऊंडेशन व दैनिक राष्ट्र उदय यांच्या संयुक्त विद्यमाने, दैनिक राष्ट्र उदयच्या २४ व्या वर्धापनदिनानिमित्त पोलिस व पत्रकारांसाठी विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रात्रंदिवस समाजाच्या सुरक्षेसाठी आणि सत्याच्या सेवेसाठी अविरत झटणाऱ्या पोलिस व पत्रकारांचे आरोग्य सुदृढ राहावे, या सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
धावपळीच्या जीवनशैलीमुळे हृदयरोग, मधुमेह यांसारख्या आजारांचा धोका वाढत असताना, वेळेवर तपासणी व मार्गदर्शन मिळावे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे.
या शिबिरात हृदयरोग व मधुमेह विषयातील तज्ज्ञ डॉक्टर
डॉ. पितांबर दिघोरे, डॉ. अमित गुजराथी व डॉ. विनोद पावरा हे उपस्थित राहून तपासणी व आवश्यक वैद्यकीय सल्ला देणार आहेत.
हे मोफत आरोग्य शिबिर
📅 रविवार, ११ जानेवारी २०२६
⏰ सकाळी ११.०० ते दुपारी १.००
📍 पोलिस स्टेशन, शिरपूर (जि. धुळे)
या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.
चंदन आबा फाऊंडेशन व दैनिक राष्ट्र उदय परिवार यांच्या वतीने सर्व पोलिस व पत्रकार बांधवांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
“जनसेवा हाच आमचा ध्यास — आरोग्य हीच खरी संपत्ती” या ब्रीदवाक्याशी निष्ठा राखत समाजहितासाठी असे उपक्रम पुढेही राबविले जातील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
