*शिरपुर शहरात श्री सदगुरु नथ्थुसिंगबाबा संस्थापित अध्यात्मिक ज्ञान प्रचार अखंड किर्तनी सप्ताह उत्साहात संपन्न*
शिरपुर —रामकृष्ण हरी...जय हरी शिरपुर तालुक्यातील सर्व भाविक भक्तांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की श्रीसदगुरु नथुसिंगबाबा संस्थापित अध्यात्मिक ज्ञान प्रचार दौरा मंडळाचा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह दि. 27 डिसेंबर 2025 ते 03 जानेवारी 2026 पर्यंत भगवंत पार्क,स्वामीनारायण मंदीराच्या शेजारी वरझडी रोड शिरपुर येथे उत्साहात संपन्न झाला यात किर्तनकार— ह.भ.प.उल्हास महाराज सुर्यवंशी पुणेकर,ज्ञानेश्वर महाराज शिंदे पुणेकर,जगदीश महाराज जोशी नासिककर, पांडुरंग महाराज घुले पुणेकर,गोविंद महाराज वरसाडे पंढरपुरकर,बाजीराव महाराज चंदिले पुणेकर,तुकाराम महाराज बारामतीकर या सर्व कीर्तनकारांनी संत ज्ञानाचा प्रसार केला तसेच दि.03जानेवारी2026 रोजी स.09 वा.काल्याचे कीर्तन *कीर्तनकार ह.भ.प. भरत महाराज जळगावकर* यांनी आपल्या मधुर वाणीतुन भगवंताची महिमा गायन करत कान्हाच्या लीला,खोड्या गायन करत सर्व भक्तांना मंत्रमुग्ध करुन घेतले किर्तनास स्वानंद सदगुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील आजी माजी विद्यार्थी श्री श्रेत्र आळंदी देवाची कलाकार तसेच शिरपुर तालुक्यातील भजनी मंडळींनी किर्तनास साथ दिली तसेच शेवटी सर्व भक्तासह महाआरती करण्यात आली व सर्व भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या प्रसंगी परमेश्वर महाराज कैन्हया महाराज आळंदीकर, मोठेबाबा,हौसानंदबाबा, तुळशिराम महाराज तसेच शिरपुर आमदार काशिरामदादा पावरा,शिरपुर वरवाडे नगर परिषद नगराध्यक्ष वारकरी भक्त भुपेशभाई पटेल,बोराडी सरपंच मा.राहुलआबा रंधे,प्रिर्यदर्शनी सह सुतगिरणी उपाध्यक्ष संग्रामसिंह राजपुत अशा सर्व प्रमुख मान्यवरांचा शाल,श्रीफळ फुलगुच्छ देवुन मान सन्मान करण्यात आला शिरपुर तालुक्यातील वारकरी,टाळकरी, शहरातील भक्तांनी सहभाग घेवुन आनंद घेतला यात शिरपुर तालुक्यातील सर्व टाळकरी,वारकरी भक्तगणांचे विशेष सहकार्य लाभत होते तसेच महिला भक्तांचा विशेष सहभाग होता तसेच सदगुरु श्री नथ्थुसिगबाबा समाधी वारकरी शिक्षण संस्था अध्यक्ष संजयसिंह राजपुत या सप्ताहाचे मार्गदर्शक होते जय हरी जय रामकृष्ण हरी
