क्रीडा तंत्रज्ञानात शिरपूर येथील संशोधकांची मोठी झेप : ‘मैच विश्लेषण दर्शक यंत्रा’ला भारत सरकारचे पेटंट”*

 


“क्रीडा तंत्रज्ञानात शिरपूर येथील संशोधकांची मोठी झेप : ‘मैच विश्लेषण दर्शक यंत्रा’ला भारत सरकारचे पेटंट”*

आर सी पटेल फार्मसी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. अमोल खंडू अहिरे, आर. सी. पटेल आयएमआरडी महाविद्यालयाच्या क्रीडा संचालिका प्रा. पूजा भोगिलाल जैन आणि एस.पी.डी.एम महाविद्यालयाचे क्रीडा संचालक तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ क्रीडा मंडळाचे सदस्य डॉ. एल. के. प्रताळे यांच्या “Match Analytics Display Device” या अभिनव यंत्रासाठी भारत सरकारकडून पेटंट मंजूर झाले आहे.

ही यंत्रणा क्रीडा क्षेत्रातील विश्लेषण आणि प्रदर्शनाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणारी आहे. यंत्राचे संपूर्ण डिझाईन प्रा. अहिरे, प्रा. जैन आणि डॉ. प्रताळे यांनी तयार करून भारत सरकार यांना सादर केले होते, ज्यामुळे त्यास अधिकृत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

या पेटंटमुळे शिरपूर चे नाव राष्ट्रीय पातळीवर उजळले असून, विद्यार्थ्यांमध्ये आणि क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञांमध्ये याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

सदर संशोधक महाविद्यालयाचे प्रशासन या यशाबद्दल अभिमान व्यक्त करत आहे आणि भविष्यात अशाच नव्या तंत्रज्ञानाचा विकास चालू ठेवण्याचा मानस आहे असे वरील संशोधकाने भावना व्यक्त केल्या.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने