शिरपूर येथे राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा
शिरपूर (प्रतिनिधी) शिरपूर ग्राहक पंचायत व तहसील कार्यालय शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिवस व्ही. व्ही. रंधे सीबीएससी स्कूल येथील सभागृहात साजरा करण्यात आला.
ग्राहक पंचायत शिरपूरचे अध्यक्ष राजेंद्र भंडारी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमास उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून तसेच स्वामी विवेकानंद आणि ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रास्ताविकात एन. वाय. बोरसे सर यांनी ग्राहकांचे हक्क कर्तव्य आणि जबाबदारी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करून ग्राहकांनी सजगता बाळगून नेहमी जागरूक राहावे व आपले फसवणूक झाल्यास ग्राहक पंचायतीकडे दाद मागावी असे आवाहन केले.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखेतर्फे शिरपूर ग्रामपंचायतचे अध्यक्ष राजेंद्र भंडारी व ग्राहक पंचायतीच्या धुळे जिल्हा पदाधिकारी आशाताई रंधे यांना जीवन गौरव पुरस्कार तसेच ग्रामपंचायत शिरपूरचे सचिव राकेश मोरे यांना उत्कृष्ट साधक पुरस्कार प्राप्त झाल्याने मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या गौरव व सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्या स्पर्धाकाचा पारितोषिक प्रदान करून गौरव करण्यात आला.
याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात राजेंद्र भंडारी यांनी सांगितले की ग्राहकांचे हक्क आणि विशेषाधिकार संविधानातही समाविष्ट आहेत परंतु बदलत्या काळानुसार ग्राहक हक्क संरक्षण कायद्यात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून ग्राहकांनी जागरूक राहुल खरेदी केली पाहिजे व फसवणूक झाल्यास ग्राहक पंचायत स्थानी शाखा व जिल्हा ग्राहक मंच आणि राज्य स्तरीय आयोगाकडे न्याय मिळवण्यासाठी योग्य पद्धतीने तक्रार करून आपल्या हक्कांचे संरक्षण केले पाहिजे.
याप्रसंगी शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. आशाताई रंधे यांनीही आपल्या सत्काराला उत्तर देताना राष्ट्रीय ग्राहक दिवसाचे औचित्य व महत्त्व सविस्तर पणे विशद करून प्रत्येक व्यक्ती ही जन्मापासून मृत्यूपर्यंत ग्राहक असतेच असे प्रतिपादन केले. साहित्यिक व प्राचार्य सारिका रंधे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. महसूल खात्यातील पुरवठा विभागाचे अधिकारी दिनेश ठाकरे यांनी ग्राहकांना कुठेही आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यास ग्राहक पंचायत तिच्या योग्य ठिकाणी अथवा शिरपूर तहसील कार्यालयात संपर्क साधावा त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून पूर्ण सहकार्य केले जाईल असे स्पष्ट केले.
कार्यक्रमात ग्राहक पंचायतीचे उपाध्यक्ष गुलाब परदेशी, कार्यकारणी सदस्य एम. के. भामरे, अर्जुन चौधरी, राजेश मारवाडी, राकेश चौधरी, सतीश पाटील तसेच पुरवठा विभागाचे राहुल मोरे व सोनिया वसावे उपस्थित होते.
ज्योती देशमुख यांनी सूत्रसंचालन तर ग्राहक पंचायतीचे कार्यकारणी सदस्य राजेश मारवाडी यांनी आभार प्रदर्शन केले.
व्ही. व्ही. रंधे स्कूलच्या प्राचार्य कामिनी पाटील व सारिका तार यांच्यासह प्रमोद पाटील, समाधान राजपूत, स्वप्निल पाटील वंदना पाटकरी, वंदना रोकडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य केले.
