जागतिक अपंग दिनानिमित्त रोटरीतर्फे दोंडाईचात रँली* दोंडाईचा अख्तर शाह

 


*जागतिक अपंग दिनानिमित्त रोटरीतर्फे दोंडाईचात रँली* 

दोंडाईचा अख्तर शाह 

( दि ३/१२/२०२५) आर सी सी रोटरी अपंग राऊंड टाऊन व रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सिनियर्स यांच्या संयुक्त विद्यमाने दोंडाईचा शहरात जागतिक अपंग दिनानिमित्त दोंडाईचा पोलीस स्थानकापासून ते बस स्थानकापावेतो पायी रँलीचे आयोजन करण्यात आले होते रँलीचे उद्घाटन दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी प्रमुख पाहुणेपदी रोटरीचे जेष्ठ सदस्य रो डॉ मुकुंद सोहनी रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष रो प्रविण महाजन इ मान्यवर उपस्थित होते .

         पोलिस निरीक्षक दिनेश सोनवणे यांनी सांगितले की दिव्यांग बंधुंना एक विलक्षण दैवी शक्ती असते त्यामुळे त्यांच्या अंगांत सर्वांपेक्षा वेगळी कला असते रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष प्रविण महाजन यांनी सांगितले की आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी अपंगांना ३ डिसेंबर २०१४ रोजी दिव्यांग शब्दप्रयोग करावा असे आवाहन देशाला केले कारण कि ज्यांच्या अंगी दैवी अंग असते त्यामुळे ते साधारण व्यक्तीला जे काम जमत नाही ते काम दिव्यांग बंधु करुन दाखवीत आहेत आज प्रशासनात अनेक दिव्यांग बंधू आपल्या बुद्धीमतेच्या जोरावर मोठ्या अधिकारी पदावर पोहोचले आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हुसेन विरदेलवाला सुत्रसंचलन राजेश बागुल व आभारप्रदर्शन जयपाल राजपुत यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी आर सी सी रोटरी अपंग राऊंडचे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने