तीन पिढ्यांची निष्ठा, आज वेदनेने संपली... आत्मसन्मानासाठी घेतला कठोर निर्णय!” — शिरपूरचे जनसेवक हेमंत गुलाबराव पाटील यांचे जनतेला भावनिक आवाहन

 


“तीन पिढ्यांची निष्ठा, आज वेदनेने संपली... आत्मसन्मानासाठी घेतला कठोर निर्णय!”

— शिरपूरचे जनसेवक हेमंत गुलाबराव पाटील यांचे जनतेला भावनिक आवाहन



भारतीय जनता पक्ष माझा आपला पक्ष .... 

शिरपूर तालुक्यात गेल्या अनेक दशकांपासून भारतीय जनता पक्षाशी आम्ही आणि आमचा परिवार कायम सोबत राहिलो अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जेव्हा पक्षाचा झेंडा धरायलाही कोणी पुढे धजावत नसत तेव्हा लोकनेते स्वर्गीय तात्यासाहेब प्रल्हादराव माधवराव पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून आपली स्वयंसेवकांची भूमिका निभावून तेव्हाचा जनसंघ व जनता पार्टी पक्षात आपली राजकीय कारकीर्द सुरू केली .. सतत शेतकरी आणि कष्टकरी यांच्या न्याय हक्कांसाठी ते लढत राहिले .. कितीही संकट आली तरी त्यांनी सामान्य जनतेसाठी झटत राहिले .. भारतीय जनता पक्षाशी तात्यासाहेब आणि परिवार कायम एकनिष्ठ राहिला .. आणि पुढची पिढी देखील कोणताही स्वार्थ न बाळगता पक्षाची नाळ कधी सोडली नाही .. 


पण 2019 साल उजाडले आणि ह्या पक्षात काँग्रेसमधून शिरपूर तालुक्याचे नेते व आमदार यांनी प्रवेश घेतला आणि त्यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले की मी भविष्यात कधीच पक्षाच्या संघटनेत भाग घेणार नाही त्यामुळे जुन्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना त्यांच्या ह्या बोलण्यावर विश्वास बसला आणि त्यांनी कुठलीही अट शर्त न घालता निःस्वार्थ भावनेने त्या 2019  अटीतटीच्या विधानसभा निवडणुकीत स्वतःला अक्षरशः झोकून दिले .. दिवस रात्र मेहनत घेऊन भाजपच्या आमदाराला विजयी करण्यात सिंहाचा वाट उचलला .. 


त्यानंतर मात्र दोन तीन वर्षांनी मूळ भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांना संघटनेतून कसे बाजूला करता येईल त्यांना कार्यक्रमातून कसे वगळण्यात येईल असे रीतसर षडयंत्र रचत त्यांना पार पक्षातूनच हद्दपार करण्यात आले .. तरीही आम्ही संयम राखत गेलो .. अपमान पचवत गेलो .. आतून विरोध कायम होत राहिला .. आणि समोर आल्यावर अगदी प्रेमाने वागायचे .. असे दुटप्पी धोरण आमच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत राबवले गेले .. अनेक वार केले गेले .. तरीही आम्ही तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत राहिलो .. का तर हा आपला पक्ष आहे तीन पिढ्यांपासून आपण ह्या पक्षात आहोत प्रामाणिक आणि एकनिष्ठ कार्यकर्ता अशी आपली जनमानसात आपली ओळख आहे .. ह्यासाठी हे सर्व सहन करत राहिलो .. 


पण जेव्हा ह्यावर्षी पक्षाच्या नवीन कार्यकारणी बनवल्या गेल्या तेव्हा तालुक्यातल्या आणि शहरातल्या जुन्या कार्यकर्त्यांना साध विचारलं देखील गेलं नाही आणि त्यात सहभागी देखील केलं गेलं नाही .. आणि ह्यावेळेस तर डावलण्याची परिसीमाच गाठली गेली .. आणि मग अखेर शेवटी संयमाचा बांध तुटला .. 

हा आमचा पक्ष ज्याला आम्ही आम्ही आमची आई मानली ..हा आमचा पक्ष ज्याला आम्ही आमचा आत्मसन्मान मानला .. हा आमचा पक्ष ज्याला आम्ही आमचा स्वाभिमान मानला ..हा आमचाच पक्ष ज्याला आम्ही आमचा जीव की प्राण मानला .. पण आज काय झालंय काय आमच्या वरिष्ठ नेतृत्वाला ???? 

हा प्रश्न आम्हाला कायम राहणार .. 


शेवटी जिथे आत्मसन्मान आणि स्वाभिमानाशी तडजोड करावी लागेल तिथे थांबणं आम्हाला कधीही शक्य नाही किंचितही नाही .. 


माझ्या शिरपूर तालुक्यातील आणि शहरातील नागरिक बंधू आणि भगिनींनो .. 

आज हा माझा आपला पक्ष सोडताना मला आणि माझ्या परिवाराला काय वेदना होतायेत हे आम्हालाच माहिती .. चार दिवसांपूर्वी जेव्हा घरच्यांसोबत पक्ष सोडतोय ह्या चर्चेसाठी बसलो तेव्हा आमच्यात शब्द कमी आणि अश्रूच जास्त बोलत बोलत होते .. मन खूप खूप उद्दीघ्न झालंय .. निराश झालंय .. असं वाटतंय की मी माझं शरीराचं एक अंग माझ्यापासून दूर करतोय .. दशकन दशकांपासून एकमेकांतला गुंतलेला धागा आज तुटतोय .. हे एकनिष्ठतेच प्रामाणिक बंधन आज तुटतंय .. 


पण करणार तरी काय ???? आत्मसन्मान आणि स्वाभिमान कधीच गहाण ठेवू शकत नाही .. त्यात तडजोड ही नाहीच .. म्हणून माझ्या भावांनो आणि बहिणीनो आज जो काही निर्णय घेतोय तो तुमच्या समक्ष आणि समोर घेतोय .. 


आपण माझ्या ह्या निर्णयाला आज आणि भविष्यात निश्चितच साथ द्याल इतकंच आपल्याला भावनिक आवाहन करतो .. 


धन्यवाद !!!! 


आपलाच जनसेवक हेमंत गुलाबराव पाटील ....


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने