“ भावेश बडगुजरचा भावनिक प्रवास आणि दुहेरी सुवर्णयश!
🗞️ बातमी:
धुळे जिल्ह्यातील फागणे गावचा तरुण खेळाडू भावेश रवींद्र बडगुजर याने भालाफेक आणि हातोडाफेक या दोन्ही क्रीडा प्रकारांत जिल्हास्तरावर चमकदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. नंतर विभागीय स्तरावरही प्रथम क्रमांक मिळवत त्याने राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे. भावेश यांनी भावना व्यक्त केली की “माझ्या प्रत्येक यशामागे माझे मामा – पुणे येथील PSI जितेंद्र सुरेश गिरनार यांचा आशीर्वाद आहे. ते माझे गुरु, मार्गदर्शक आणि आयुष्याचे प्रेरणास्थान होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या स्वप्नांची पूर्तता हेच माझं ध्येय बनलं.”
महाविद्यालयीन परीक्षेमुळे राज्यस्तरीय सामन्यात सहभागी होऊ न शकल्यानंतर, एका दुसऱ्या विद्यापीठाने त्याला सर्व सुविधा देत त्यांच्याकडून खेळण्याची संधी दिली. ती त्याच्यासाठी प्रेरणादायी ठरली. आणि आता पुन्हा विद्यापीठस्तरीय सामन्यात नाशिक विभागातून प्रथम क्रमांक पटकावत भावेश झोन लेव्हल स्पर्धेसाठी निवडला गेला आहे.
“वेदना माझ्या उर्जेत बदलतात — आणि हीच ऊर्जा मला प्रत्येक यशाकडे नेते.”
धुळे जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशनतर्फे आयोजित जिल्हास्तरीय अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत भावेश बडगुजरने हातोडाफेकमध्ये प्रथम तर भालाफेकमध्ये तृतीय क्रमांक पटकाविला. त्याचबरोबर कुणाल गोविंद चव्हाण (रा. फागणे) यानेही हातोडाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक मिळवले.
दोन्ही खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल माजी आमदार कुणाल पाटील यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
फागणे गावातील हे दोन्ही खेळाडू ग्रामीण भागातून राष्ट्रीय पातळीवर झेप घेण्याचे स्वप्न पाहत आहेत. भावेश बडगुजरच्या यशामागे जिद्द, वेदना आणि मामांचा आशीर्वाद — ही तिन्ही त्याच्या विजयाची खरी प्रेरणाशक्ती ठरली आहे. मात्र यातूनच त्यांनी सुवर्ण यश प्राप्त केला आहे.
