स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या स्वाभिमानी लढाईला जाहीर पाठिंबा - डॉक्टर जितेंद्र ठाकूर



 स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या स्वाभिमानी लढाईला जाहीर पाठिंबा - डॉक्टर जितेंद्र ठाकूर 


शिरपूर तालुक्यात होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीत सत्ताधाऱ्यांपुढे आव्हान उभे करण्यासाठी शहरातील स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटाची वाट धरत निवडणुकीत रंग भरला असून त्यांनी सत्ताधाऱ्यांपुढे एक नवे राजकीय आव्हान उभे केले आहे. या सर्व स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या या स्वाभिमानी लढ्यास माझ्या जाहीर पाठिंबा आहे असे प्रसिद्ध पत्र जितेंद्र ठाकूर यांनी प्रसिद्ध केले आहे. 


शिरपूर तालुक्याच्या राजकारणात मागील दशकांपासून सत्तेच्या साम्राज्या पुढे स्वाभिमानाने लढा देणारे, कोणत्याही आमिषाला बळी न पडणारे, सामान्य जनतेच्या सेवेत उभे राहून आरोग्य सेवा प्रदान करणारे डॉक्टर जितेंद्र ठाकूर या तालुक्यातील प्रत्येकालाच परिचित आहेत. त्यांनी या तालुक्यात दशकांपासून सत्तेच्या विरोधात लढा दिला. जनतेच्या दरबारात त्यांना न्याय मिळाला मात्र कूटनेतिक राजकारण, सत्तेचा दबाव, विश्वासघात यामुळे त्यांना नेहमीच राजकारणात काही राजकीय पुढारी, राजकीय पक्ष यांनी नेहमीच धोका दिला. तरीदेखील त्यांनी अपक्ष उमेदवारी करून वारंवार या तालुक्यात लोकशाही आणि स्वाभिमान जिवंत ठेवला. त्यांच्या या स्वाभिमानीच्या लढ्यात तालुक्यातून अनेकांनी आपले योगदान दिले. यावेळेस या कार्यकर्त्यांनी कोणता पक्ष पाहिला नाही, कोणता नेता पाहिला नाही पाहिली ती फक्त प्रामाणिक लढण्याची इच्छाशक्ती. आणि हेच कार्यकर्ते निवडणुकीत माझे खरे बळ होते. मतांनी जरी पराभव झाला असला तरी जनतेचे आशीर्वाद कधीच कमी पडले नाहीत. या सर्व लढ्यात याच स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी आजवर राजकीय बळ दिले. 


आज शिरपूर तालुक्यात पुन्हा एकदा सत्तेच्या विरोधात आपला आवाज बुलंद करत , पुन्हा एकदा स्वाभिमानाची ज्योत पेटवली असून खऱ्या अर्थाने या तालुक्यात लोकशाही रुजवण्यासाठी लढा देत संघर्ष उभा केला आहे. एकेकाळी एकनिष्ठ आणि खंबीर कार्यकर्त्यांची पार्टी म्हणून ओळख असलेली भारतीय जनता पार्टी आज तालुक्यात मूळ कार्यकर्त्यांपासून फिरवली असून बाहेरून आलेल्या लोकांचे या पार्टीवर अतिक्रमण झाले आहे. तालुक्यातील भारतीय जनता पार्टी ही भारतीय जनता पार्टी राहिली नसून ती आज भाई जनता पार्टी म्हणून ओळखली जात आहे. एका राष्ट्रीय पक्षाचे अशा प्रकारे अधपतन निश्चितच दुर्दैवी आहे.

मात्र याच स्वाभिमानी कार्यकर्त्यांमुळे ज्या निवडणुका सत्ताधाऱ्यांना सहज सोप्या आणि एकतर्फी वाटत होत्या ते आता त्यांना डोईजड होताना दिसत आहेत. 


त्यामुळे मी तालुक्यातील या सर्व स्वाभिमानी शिलेदारांच्या सोबत असून, ज्याप्रमाणे त्यांनी माझ्यासाठी कोणताही पक्ष धर्म व्यक्ती पाहिला नाही अगदी त्याचप्रमाणे त्यांच्या स्वाभिमानाच्या लढासाठी लोकशाहीच्या रक्षणासाठी, सामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणाऱ्या प्रत्येक स्वाभिमानी कार्यात कार्यकर्त्यांसोबत मी आहे. या पत्रकातून मी त्यांच्या या लढ्यास जाहीर पाठिंबा देत आहे. शिरपूर तालुक्यात मला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा तालुक्यातील जनतेला विनंती करतो, ज्याप्रमाणे तुम्ही मला बळ दिले राजकीय इच्छाशक्ती दिली, अगदी त्याचप्रमाणे भक्कमपणे तुम्ही पुन्हा एकदा या स्वाभिमानी शिलेदारांच्या मागे उभे रहा, त्यांना मदत करा, आणि लोकशाहीतील प्रमुख हक्क मतदानातून आपली ताकद दाखवून या तालुक्याला परिवर्तनाच्या दिशेने जाण्यासाठी पुढे या असे मी आपल्या सर्वांना विनम्र आवाहन करतो. 

आणि या सर्व स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या लढ्याला पाठिंबा जाहीर करतो. 

आपलाच डॉक्टर जितेंद्र ठाकूर


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने