*सिसीआय चा कापूस व भरडधान्यांची खरेदी मर्यादा वाढवावी.*
*क्षत्रिय शिवराणा कृषी मंडळ व बहुउद्देशिय संस्थेची निवेदनाद्वारे मागणी*
शिरपूर प्रतिनिधी -
कृषी उत्पन्न बाजार समिती शिरपूर येथे लिपिक हर्षल बोरसे यांना क्षत्रिय शिवराणा कृषी मंडळ व बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष राजकिरण राजपूत व शेतकरी यांनी निवेदन दिले,त्यांनी आश्वस्त केले कि,आमचा वरिष्ठ कार्यालयात आपले निवेदन पाठवून आपल्या मागणीचा विचार करायला लावू शासनाचा पणन विभागामार्फत कापूस व भरडधान्य यांची नोंदणी व खरेदी करण्यात येत आहे.कापूस पिकाची सद्या हेक्टरी ११ क्किटल खरेदी करण्यात येत आहे.त्याऐवजी हेक्टरी ३० क्किटल व भरडधन्यातील मका पिकाची हेक्टरी ६० क्किटल,सोयाबीन व इतर पिकांसाठी हेक्टरी २५ क्किटल करण्याची मागणी करण्यात आली.
यावर्षी खरीप हंगामातील पिकांचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.शेतकरी यांच्या मालाला स्थानिक व्यापारी यांच्याकडून कमी भावात शेतीमाल खरेदी करण्यात येत आहे.अर्धा शेतीमाल शासनाचा हमी भावात आणि अर्धा व्यापारी यांना याप्रमाणे असे नकरता खरेदीची मर्यादा वाढवून शेतकरी यांना दिलासा देऊन खरेदीचा नियम व अटीमध्ये शिथिलता देऊन सहकार्य करावे.आमचा संस्थेचा रास्त मागण्या आपल्या वरिष्ठ कार्यालयात पाठवव्यात.अशी विनंती आपणास करण्यात येत आहे.
