मुख्याध्यापक आणि उपशिक्षक १५ हजारांच्या लाचेप्रकरणी रंगेहात अटक – शिरपूर तालुक्यात शिक्षण क्षेत्रात खळबळ!

 



मुख्याध्यापक आणि उपशिक्षक १५ हजारांच्या लाचेप्रकरणी रंगेहात अटक – शिरपूर तालुक्यात शिक्षण क्षेत्रात खळबळ!


धुळे : 


शिक्षण क्षेत्राचा गौरव कलंकित करणारी धक्कादायक घटना शिरपूर तालुक्यात घडली आहे.

जनता शिक्षण प्रसारक संस्था, बेटावद  ता .शिंदखेडा, जि. धुळे) संचलित महात्मा गांधी विद्यालय, मांजरोद (ता. शिरपूर) येथील मुख्याध्यापक कैलास सखाराम पाटील (वय ५६) आणि उपशिक्षक गोपाळ रघुनाथ पाटील (वय ४७) यांना ₹१५,००० लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.


तक्रारदार हे त्या शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या बाबतीत जुलै २०२३ पासून एक वर्षाची वार्षिक वेतनवाढ स्थगित करण्यात आली होती, तसेच १२ वर्षांची सेवा पूर्ण होऊनही वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्यात आली नव्हती.

तक्रारदारांनी हे प्रकरण मुख्याध्यापक कैलास पाटील यांच्याकडे मांडले असता, त्यांनी “तुझे काम करण्यासाठी ₹१५,००० उपशिक्षक गोपाळ पाटील यांना द्यावे लागतील, त्याशिवाय काम होणार नाही,” असे सांगितले.


या उघड लाच मागणीने त्रस्त झालेल्या तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांच्याशी संपर्क साधला.


सहाय्यक पोलीस अधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तक्रारीची पडताळणी केली.

दि. ०६ नोव्हेंबर २०२५ रोजी पडताळणी दरम्यान मुख्याध्यापक पाटील यांनी तक्रारदाराला उपशिक्षक गोपाळ पाटील यांच्याकडे पाठवले, आणि पंचांच्या उपस्थितीत गोपाळ पाटील यांनी ₹१५,००० लाच स्वीकारण्याचे मान्य केले.


यानंतर दि. १२ नोव्हेंबर २०२५ रोजी धुळे लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचला, आणि त्यादरम्यान उपशिक्षक गोपाळ पाटील यांनी तक्रारदाराकडून ₹१५,००० लाच स्वीकारली.

त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर मुख्याध्यापक कैलास पाटील यांनाही अटक करण्यात आली.


या प्रकरणी थाळनेर पोलीस ठाण्यात

भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.


या कारवाईत पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, पद्मावती कलाल तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, रेश्मा परदेशी, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदी अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.


तपासाची सूत्रे सचिन साळुंखे (पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे) यांच्या हाती असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण कारवाई पार पडली. या कारवाईसाठी भारत तांगडे (पोलीस अधीक्षक), माधव रेड्डी (अपर पोलीस अधीक्षक),  सुनिल दोरगे (अपर पोलीस अधीक्षक, नाशिक परिक्षेत्र) यांचे मार्गदर्शन लाभले.


या घटनेने शिरपूर तालुक्यासह संपूर्ण धुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. शिक्षकांच्या नावावर लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.


लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की,


 “कोणताही शासकीय कर्मचारी अथवा अधिकारी लाच मागत असल्यास त्वरित आम्हाला कळवा. नागरिकांच्या हितासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.


#लाचलुचपत #शिक्षणातीलभ्रष्टाचार #शिरपूरबातमी #धुळे #मुख्याध्यापकलाचप्रकरण #NirbhidVichar #CorruptionInEducation #AntiCorruptionAction #BreakingNews #MarathiNews

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने