*शिक्षणाच्या उपयोग हा फक्त नोकरीसाठी नव्हे तर समाजासाठी पण झाला पाहिजे हेच बाबासाहेबांचे विचार; अजय कढरे*
*धम्मचक्र प्रवर्तन दिन टेंभे येथे उत्साहात साजरा..!*
शिरपूर: तालुक्यातील टेंभे बु. येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन व अशोका विजयादशमी उत्साहात साजरा करण्यात आली.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर व जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध यांचे प्रतिमापूजन करून भीम नगर येथील मुख्य फलक व रमाई नगर येथील फलकास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी सामूहिक बुद्ध वंदना डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघर्ष कृती समितीचे संस्थापक-सचिव आयु.अजय नवल कढरे यांच्यातर्फे घेण्यात आली. याप्रसंगी त्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील एकतावादी समाज निर्माण करायचा आहे. धम्मचक्र प्रवर्तनाचा जो संदेश आहे की खरी प्रगती ही केवळ शिक्षण, रोजगार किंवा भौतिक सुख संपत्तीने होत नाही तर विचार मूल्ये आणि आचरणात होणारे बदल आणि समाजाची प्रगतीनेच होत असते. डॉ.बाबासाहेबांनी दिलेल्या तथागत भगवान बुद्धांचा धम्मानेच आपला उद्धार झाला. शिक्षण हे फक्त नोकरीसाठीच नव्हे तर समाजासाठी पण उपयोगात आले पाहिजे असे बाबासाहेबांचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे. असे त्यांनी सांगितले.
यावेळी मधुकर कढरे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर समिती अध्यक्ष निलेश कढरे, सचिव अजय नवल कढरे, भैय्या कढरे, दिनेश कढरे, सागर कढरे, जिगर कढरे, सागर कढरे, रविंद्र कढरे, अनिल कढरे, बाळा कढरे, करण कढरे, गौरव कढरे, सुमित कढरे, कुणाल कढरे, यश कढरे, आरव कढरे, माजी उपसरपंच विमलबाई कढरे, समिती महिला कार्याध्यक्षा अंजना कढरे, समाज एकता स्वय सहाय्यता बचत गट समुह अध्यक्षा भारती कढरे, बचत गट अध्यक्षा वैशाली कढरे, पमाबाई कढरे, सुमनबाई कढरे, रमाई गट अध्यक्षा कविताबाई कढरे, सुशिलाबाई कढरे, सुरेखाबाई कढरे समाजातील महिला व समस्त बौद्ध आंबेडकरी समाज बांधव उपस्थित होते.