प्रशासन गावकुसाशी : पिंपरीत ग्राम महसूल कार्यालयाचे लोकार्पण!
पिंपरी (प्रतिनिधी) : शिरपूर तालुक्यातील पिंपरी येथे दि. १ ऑक्टोंबर रोजी सकाळी ८:३० वाजता ग्रामस्थांच्या शासकीय कामकाजासाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या (आढे-पिंपरी) सजाचे संयुक्त ग्राम महसूल कार्यालयाचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तथा उद्घघाटक सेवानिवृत्त मंडळ अधिकारी श्री. विवेक वाघ, प्रमुख पाहुणे म्हणून थाळनेर मंडळ अधिकारी श्री. बाळासाहेब सानप, तर व्यासपीठावर श्री. शांतीलाल जमादार, श्री. प्रविण पाटील उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान सेवा पंधरवडा दि. १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोंबर निमित्ताने
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व वृक्षारोपण करून झाली. सूत्रसंचालकांनी पाहुण्यांची ओळख करून दिली व यानंतर गावातील पदाधिकारी यांच्यावतीने उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. तर जिवंत सातबारा योजनेअंतर्गत प्रातिनिधिक स्वरूपात श्री.रणजीत सिसोदिया, श्री. भारत राजपूत, श्री. दिपक भिल, श्री.मयुर कोळी यांना सुधारित सात बारा मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. प्रास्ताविकामध्ये गावात महसूल कार्यालय सुरू झाल्यामुळे होणाऱ्या सोयीसुविधांचा आढावा घेण्यात आला.
यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या भाषणात श्री. विवेक वाघ यांनी सांगितले की, “ग्राम पातळीवर प्रशासन थेट नागरिकांपर्यंत पोहोचवणे हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या कार्यालयामुळे शेतकरी, विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना आता सातबारा उतारा, नकाशे, फेरफार नोंदी, उत्पन्न व जातीचे दाखले यांसारखी कामे गावातच सहजरीत्या करता येतील.” कार्यक्रमादरम्यान नागरिकांनीही आपली मते व्यक्त करत ग्राम महसूल कार्यालयामुळे होणाऱ्या सोयी बद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी पिंपरी येथील पदाधिकारी श्री.वासुदेव गिरासे, श्री.संजय धनगर, श्री. महेंद्र गिरासे, श्री.रोहित गिरासे, श्री.रणजीत सिसोदिया, श्री.किशोर पाटील, श्री.भारत राजपूत, श्री.भुरा गिरासे, श्री. नवनाथ पाटील, श्री. निंबा पाटील, श्री.मनोज राजपूत, श्री. विजय खैरनार, श्री.योगेंद्र सत्तरसिंग राजपूत, श्री.रणजीत शामसिंग पाटील, श्री.जितेंद्र धनगर, श्री.जितेंद्र कोळी, श्री. राजु धनगर, श्री.आबा धनगर, श्री. भिका कोळी, श्री. दीपक भिल आढे येथील श्री.विजयसिंग राजपूत, श्री.दगडू पाटील, श्री.विनोद राजपूत यांच्यासह
ग्राम महसुल अधिकारी श्री. एन.एस.पटेल, श्री.नवनित पाटील, श्री.जयेश राजपूत, श्री.एस.एस.काशिद, श्री.शुभम गवळी, श्री.शुभम रामटेके, श्री.रजनीकांत कांगोणे, कोतवाल श्री.जयेश धनगर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिंपरी चे आदर्श पोलीस पाटील श्री. जयपालसिंह गिरासे यांनी तर प्रास्ताविक श्री. नवनीत पाटील,
आणि आभार प्रदर्शन ग्राम महसूल अधिकारी श्री. तुषार शेळके यांच्यावतीने करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, महसूल विभागातील कर्मचारी व ग्रामस्थ यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. या कार्यक्रमाला स्थानिक जनप्रतिनिधी, महसूल प्रशासनातील अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.