राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिरपूरतर्फे विजयोत्सव, शताब्दी वर्ष भव्य आयोजन"

 


"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिरपूरतर्फे विजयोत्सव, शताब्दी वर्ष भव्य आयोजन"

शिरपूर (प्रतिनिधी) :

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिरपूरतर्फे विजयोत्सवाचा भव्य सोहळा यावर्षी विशेष उत्साहात साजरा केला जाणार आहे. संघ स्थापनेला यंदा शताब्दीपूर्व १०० वर्षे पूर्ण होत असल्याने हा ऐतिहासिक क्षण साक्षीदार ठरणार आहे.

दिनांक ४ ऑक्टोबर २०२५ रोजी शनिवार, संध्याकाळी ६ वाजता शिरपूर तालुका क्रीडा संकुल, बजरंगदादा व्यायामशाळा मार्ग, बाजार समिती जवळ येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. सुकराम मोतीराम पावरा (आरोग्य दूत व समाजसेवक, सांगवी) आणि मा. दिलीप दगडू  बाशिंगे (समाजसेवक, संचालक, गोल्डन बँक, शिरपूर) उपस्थित राहणार आहेत.

तर मार्गदर्शनासाठी मा. श्री. रवींद्र जी किरकोळे (अखिल भारतीय समरसता सहसंयोजक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. डॉ. सुनील चुनीलाल गोराणे, तालुका संघचालक, शिरपूर हे भूषवणार आहेत.

याशिवाय, २ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता विजयादशमी निमित्त शस्त्रपूजन व पथसंचलन आयोजित करण्यात आले आहे. यावेळी सर्व स्वयंसेवक, इच्छुकांनी उपस्थित राहून ऐतिहासिक औचित्यवर्धन करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शिरपूर शहर व ग्रामीण भागातून दोन वेगळ्या मार्गाने पथसंचलन काढले जाणार असून, शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे.

👉 संपर्कासाठी :

गणवेशाची सोय – श्री. नितीन चौधरी (नगर) ७०२८९३२३८४

श्री. निलेश परदेशी (ग्रामीण) ८३२८८३४८८५

या शताब्दी वर्षात राष्ट्रीय स्वयं संघ मार्फत विविध पंच सूत्री कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून वर्षभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शताब्दी महोत्सव साजरा केला जात आहे. 

वरील सर्व आयोजित कार्यक्रमासाठी जनतेने स्वयंपूर्ण सहभाग घेऊन हे आयोजन सफल करावे असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने