धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शिरपूर येथे भव्य धम्मवंदना व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
दि. २ ऑक्टोबर २०२५ रोजी भारताच्या सामाजिक क्रांतीस नवे वळण देणाऱ्या ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून, तसेच सम्राट अशोक विजयादशमी निमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती, शिरपूरच्या प्रांगणात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात बौद्ध-आंबेडकरी जनतेच्या वतीने सामूहिक धम्मवंदना, वाचन संस्कृतीवर्धक उपक्रम, समाजहितकारी उपक्रम व संगीतमय "धम्मपहाट" अशा विविध कार्यक्रमांनी उपस्थित प्रबुद्ध जनतेला प्रेरणादायी वातावरणाचा अनुभव दिला. कार्यक्रमाच्या प्रारंभी बाजार समितीच्या आवारातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला मा. आमदार काशीराम दादा पावरा, मा. जि.प. अध्यक्ष डॉ. तुषारजी रंधे, मा. चिंतनभाई पटेल, मा.बबनराव चौधरी, जि.प. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, डी.वाय.एस.पी. गोसावी साहेब, पोलिस निरीक्षक परदेशी साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. के.डी. पाटील, नगरसेवक गणेश भाऊ सावळे,मा. नगरसेवक पिंटूभाऊ शिरसाट, केशवआण्णा सावळे,प्रा.शैलेंद्र सोनवणे, बाबुदादा खैरनार, प्रताप सरदार,यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली. विविध विभागातील अधिकारी व स्थानिक सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते याही प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सामूहिक धम्मवंदना यानंतर सर्व उपस्थितांनी सामूहिक धम्मवंदना ग्रहण केली. प्रास्ताविक प्रवीण शिरसाट यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील बैसाणे यांनी केले. विधी संचालन विजयानंद शिरसाट यांनी सांभाळले.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेले संगीतमय धम्मपहाट प्रेक्षकांना भारावून टाकणारे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील कृतज्ञतेची आणि प्रेरणेची भावना जागवणारी भीमगीते सादर झाली.या निमित्ताने समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले.मा. नगरसेवक गणेश भाऊ सावळे यांच्या वतीने रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.अंदाजे २०० शालेय विद्यार्थ्यांना पायातील बूट भेटस्वरूप देण्यात आले.२०० बौद्धधम्मावरील पुस्तके सस्नेह भेट देण्यात आली.तसेच साहित्य वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी "बालकुमार दिवाळी अंक २०२५" या विशेषांकाचे १०० शालेय विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले. या अंकात प्रेमचंद यांनी शंभरी वर्षांपूर्वी रचलेल्या पाच कथांचे अनुवाद असून ते बालकुमारांच्या भावविश्वाला उजाळा देणारे आहेत. बुद्धिस्ट प्रबोधन मंच, शिरपूर यांच्या वतीने या मासिक "वैचारिक-बौद्धिक खाऊ" म्हणून वितरीत करण्यात आले.या प्रसंगी उपस्थित मान्यवर भीमराव दादा मोरे, मा.नगरसेवक बाबूदादा खैरनार, सुरेश अहिरे, अशोकजी ढिवरे, रमेश वानखेडे, प्रताप सरदार, बापुसाहेब ईंदासे, मुकुंद बैसाणेआनंदा खैरनार, रोहिदास थोरात,रमेश कढरे,प्रताप सरदार, सुनील बैसाणे,रमेश वानखेडे, महेंद्र कढरे गोविंदा थोरात, मूलचंद शिरसाठ, राजेंद्र रणदिवे, विकी ढिवरे, उमेश सावळे,गौतम निकुंभे,भटू पवार शौकीन कुवर, राहुल पवार, प्रज्ञावंत बिराडे, गौतम मोरे.या प्रसंगी आयु.संजयजी जगदेव,कपिल मोरे,आयु.प्रविण शिरसाट, रमेश कढरे,राहुल पवार,महेंद्र कढरे,गौतम थोरात, शौकीन कुवर,मुकेश सैंदाणे,दिनेश सावळे, दत्ता थोरात, ज्वाला मोरे, रमेश वानखेडे,आयु.खंडु महिरे, हिम्मत सैंदाणे,मूलचंद शिरसाट,मुकुंद बैसाणे,विश्वास शिरसाट,हिम्मत शिरसाट, मुकेश सैंदाणे, जितेंद्र भदाने,लोटन थोरात, प्रताप देवरे, विक्कीभाऊ ढिवरे,नागसेन पानपाटिल,आयु.रोहिदास थोरात, दिलिप ईंदासराव, रोहिदास थोरात, अविनाश बैसाणे, दीपक अहिरे, पारस नागमल,गोपाल थोरात ,व सर्व स्तरातील प्रबुद्ध नागरिक स्वयंप्रेरणेने उपस्थित होते. यांच्यासह शिरपूर तालुक्यातील समाजकार्यकर्ते उपस्थित होते. तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.धम्म परिवर्तना प्रती प्रेरणा दर्शविणारा याही वर्षी हा कार्यक्रम सामाजिक बांधिलकी, वैचारिक विकास व बौद्ध संस्कृतीचा प्रसार साधणारा ठरला. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या या भव्य सोहळ्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा आणि बुद्धांच्या धम्मतत्त्वज्ञानाचा पुनःस्मरण करत समाजात नवा उत्साह, प्रेरणा व संघटितपणाची जाणीव निर्माण केली.