**मोटार सायकलची चोरी करणारा आरोपी दोंडाईचा पोलीसांच्या ताब्यात*"
दोडाईचा मुस्तफा शाह
मा. पोलीस अधीक्षक धुळे श्रीकांत धिवरे यांनी नोटार सायकल बोरीचे वाढते प्रमाणास आळा घालुन कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.
त्यानुसार दिनांक- २१/०९/२०२५ रोजी पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे, दोंडाईचा पोलीस ठाणे, धुळे यांना गोपनीय बातमी मिळाली की, दोंडाईचा पोलीस ठाणे हद्दीत मालपुर रोडवर असलेल्या म्हसल्ल्या मारुती नगर येथे लाल रंगाची पेंशन प्रो मोटार सायकल ही चोरीची असल्याचा संशय आहे. त्यावरुन शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी म्हसलल्या मारती नगर येथे सापळा रचुन शोध घेत असतांना लाल रंगाच्या पॅशन प्रो गाडीचा ही एका घराच्या आडोशाला एका संशयित इसमाच्या ताब्यात दिसुन आल्याने त्यास पोलीसांनी ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव विष्णु किसन वळवी रा. म्हसल्ल्या मारुती नगर, दोडाईचा ता. शिंदखेडा जि. धुळे असे सांगितले, त्यास पोलीसांनी विश्वासात घेवुन विचारपूस करता त्याने वेगवेगळ्या ठिकाणहुन चोरी केलेल्या ०८ मोटार सायकली लपवून ठेवल्या होत्या त्या काढून दिल्या त्याचे वर्णन पुढील प्रमाणे-
१) ४५,०००/- रु.कि.ची हिरो कंपनीची शाईन विना नंबर प्लेटची मोटार सायकल.
२) ४०,०००/- रु.कि.ची हिरो कंपनीची फेशन प्रो मॉडल मोटार सासाकल क्र. MH-18-AS-8502.
३) ४५,०००/- रु.कि.ची हिरो कंपनीची सुपर स्प्लेंडर मॉडल असलेली विना नंबर प्लेटची मोटार सायकल. ४)
३०,०००/ रु.कि.ची हिरो होंडा कंपनीची पेंशन प्लस मॉडल असलेलो मोटार सायकल क्र. MH-18-5-5418.
५) ४०,०००/- रु.कि.ची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मॉडल असलेली विना नंबर प्लेटची मोटार सायकल
६) ३५,०००/- रु.किं.ची हिरो कंपनीची HF-डिलक्स मॉडल असलेली विना नंबर प्लेटची मोटार सायकल.
७) ५५,०००/- रु.कि.ची हिरो कंपनीची पेंशन प्रो मॉडल असलेली मोटार सायकल क्र. MH-39-2-1664.
८) ५०,०००/-रु.कि.ची हिरो कंपनीची पेंशन प्रो मॉडल असलेली मोटार सायकल क्र.MH-18-AQ-4798
असा एकुण ३ लाख ४० हजार रुपये किंमतीच्या एकूण ०८ मोटार सायकल या आरोपीताच्या ताब्यातुन जप्त करण्यात आल्या असुन त्यातील मोटार सायकल क्र.एम.एच.१८ ए.एस.८५०२ ही गाडी दिनांक ०४/०९/२०२५ रोजी जयहिंद कॉलनी दोंडाईचा येथुन गोविंद भावसार यांच्या घराच्या गेटमधुन चोरी झाल्याबाबत अज्ञात चोरट्याविरुध्द दोंडाईचा पोलीस ठाणे येथे गुरंन-२३८/२०२५ बो.एन.एस. कलम-३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात आरोपोतास अटक करण्यात आलेले आहे. सदर गुन्ह्याचा तपास हा पोलीस हवालदार रमेश वाघ हे करीत आहेत.
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपुर सुनिल गोसावी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे, सपोनि दिगंबर शिंपी, पोउपनि अविनाश दहिफळे, नकुल कुमावत, राजन दुसाने, पोलीस अंमलदार रविद्र गिरासे, रमेश वाघ, योगेश महाजन, नरेश मंगळे, हिरालाल सुर्यवंशी, प्रविण निकुंभे, अक्षय शिंदे, सौरभ बागुल, होमगार्ड अनिन शहा अशांनी केली आहे.