धुळे महानगरपालिकेतील आरोग्य विभागाचा मुकादम लाच घेताना रंगेहात पकडला
धुळे :
धुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील मुकादम रविंद्र शामराव धुमाळ (वय ४५ वर्षे) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांनी ७,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
📌 नेमकं प्रकरण काय?
फिर्यादी हे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. सफाई कर्मचाऱ्यांच्या ड्युटीवर देखरेख करण्याचे आणि त्यांची दैनंदिन हजेरी स्वच्छता निरीक्षकाकडे पाठवण्याचे काम मुकादम धुमाळ यांच्याकडे होते. या हजेरीच्या आधारे सफाई कर्मचाऱ्यांचा पगार मंजूर होत असतो.
ऑगस्ट २०२५ अखेरपर्यंत फिर्यादी यांचा पगार सोडवण्यासाठी आरोपी धुमाळ यांनी वारंवार दबाव आणत ८,००० रुपयांची लाच मागणी केली होती. तडजोडीअंती त्यांनी ७,००० रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले.
📌 कारवाई कशी झाली?
फिर्यादीने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. विभागाने पडताळणी करून गुरुवार, दि. ११ सप्टेंबर २०२५ रोजी सापळा रचला. या सापळा कारवाईत आरोपी मुकादम धुमाळ यांना पंचासमक्ष ७,००० रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.
📌 पुढील प्रक्रिया
आरोपीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ कलम ७ अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला आहे.
प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे करत आहे.
📌 कारवाईतील प्रमुख अधिकारी व पथक
सापळा पर्यवेक्षण अधिकारी : सचिन साळुंखे, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे
सापळा अधिकारी : यशवंत बोरसे, पोलीस निरीक्षक
सहाय्यक अधिकारी : पद्मावती कलाल, पोलीस निरीक्षक
सापळा पथक : राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पाटील, मकरंद पाटील, रामदास बारेला, प्रविण पावरा, प्रशांत बागुल, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, रेश्मा परदेशी, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर
📌 मार्गदर्शन
मा. श्री भारत तांगडे, पोलीस अधीक्षक, धुळे
मा. श्री माधव रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक
मा. श्री सुनिल दोरगे, अपर पोलीस अधीक्षक, नाशिक परिक्षेत्र
📌 लाचलुचपत विभागाचे आवाहन
शासकीय / निमशासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांनी कामाकरिता लाच मागितल्यास त्वरित धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने केले आहे.
.jpeg)